काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:26 PM2019-09-23T15:26:30+5:302019-09-23T15:27:57+5:30

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील युजर्सला आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

WhatsApp to End Support for iOS 8 and All Windows Phones By 2020 | काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS डिव्हाईससाठी सपोर्ट करणं बंद करणार आहे.अँड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्समध्ये आता मेसेजिंग अ‍ॅपकडून रेग्युलर अपडेट्स मिळणार नसल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. iOS 8 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणं बंद होणार आहे.

नवी दिल्ली -  व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील युजर्सला आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS डिव्हाईससाठी सपोर्ट करणं बंद करणार आहे. काही अँड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्समध्ये आता मेसेजिंग अ‍ॅपकडून रेग्युलर अपडेट्स मिळणार नसल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. 

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, iOS 8 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणं बंद होणार आहे. तसेच अँड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अँड्रॉईड स्मार्टफोन्सना देखील व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळणार नाहीत. या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपॅटिबिलिटी 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपणार आहे. 

iOS 8 ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू असणाऱ्या युजर्सना थोडा दिलासा आहे. 'नो सपॉर्ट फॉर iOS 8! जर युजर्सकडे iOS 8 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल असेल तर ते वापरता येईल मात्र अ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर ते पुन्हा इन्स्टॉल करून व्हेरिफिकेशन करता येणार नाही.  iOS 8 कंपॅटिबिलिटी 1 फेब्रुवारी 2020 तर विंडोज फोनसाठी 31 डिसेंबर 2020 ला ती संपणार आहे' अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.  

Be! Now you can share whatsapp status on Facebook | व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी 'Fingerprint Lock Feature' आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅप लॉक अथवा अनलॉक करू शकतात. काही दिवसांपूर्वी WABetaInfo ने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये ही नवीन फिंगरप्रिंट लॉकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन युजर्सना 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होणार. यानंतर युजर्स आपले फिंगरप्रिंट येथे रजिस्टर करू शकणार आहेत. 

these 3 new features are coming on whatsapp it is special for android ios and web users | खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार

Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज

व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवण्यात येणारे स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. त्यामुळे या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकशी लिंक करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डिलीट करण्यात आल्यानंतर मात्र फेसबुकवर शेअर केलेले स्टेटस डिलीट होणार नसून फेसबुकवर कायम राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सुरुवातीला हे नवीन फीचर फक्त बीटी व्हर्जन युजरसाठी उपलब्ध करण्यात आले होते, मात्र आता सर्व फोनमध्ये हे नवीन फीचर वापरता येणार आहे. तसेच  व्हॉट्सअ‍ॅपवरून फेसबुकवर शेअर केलेल्या स्टेटसमध्ये केवळ फोटो किंवा पिक्चर टेक्स्टचं दिसू शकणार आहे.

 

Web Title: WhatsApp to End Support for iOS 8 and All Windows Phones By 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.