फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:07 PM2021-07-22T14:07:54+5:302021-07-22T14:08:35+5:30

HalloApp ची निर्मिती WhatsApp चे माजी ग्लोबल बिजनेस हेड Neeraj Arora यांनी मायकल डोनोह्यू यांच्यासोबत मिळून केली आहे.  

Whatsapp ex employee neeraj arora launched halloapp for android ios private social network application news  | फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती  

फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती  

Next

WhatsApp चे माजी ग्लोबल बिजनेस हेड नीरज अरोरा यांनी HalloApp नावाच्या नवीन अ‍ॅपची निर्मिती केली आहे. नीरज यांच्यासोबत त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपमधील माजी सहकारी मायकल डोनोह्यू देखील आहेत. या दोघांनी व्हॉट्सअ‍ॅपमधील आपला अनुभव वापरून जाहिरात-मुक्त, खाजगी सोशल नेटवर्कची निर्मिती केली आहे. हा अ‍ॅप ‘रियल-रिलेशनशिप नेटवर्क’ असल्याचे, नीरज यांचे म्हणणे आहे.  

नीरज यांनी ट्विटरवरून HalloApp लाँच करण्याची घोषणा केली. पारंपरिक सोशल मीडिया अ‍ॅपप्रमाणे हेलो अ‍ॅपमध्ये जाहिरात, बॉट, लाइक आणि फॉलोअर्सविना येतो. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकांशी संपर्क साधू शकता. हा प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सची कोणतीही खाजगी माहिती गोळा करत नाही किंवा वापरत नाही. तसेच या अ‍ॅपमधील चॅट्स एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड असतील. फेसबुक आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे हेलोअ‍ॅप अल्गोरिदमचा वापर करत नाही.  

हेलोअ‍ॅप Apple App Store आणि Google Play Store वरून डाउनलोड करता येईल. सध्यातरी फेसबुकप्रमाणे हा ब्राऊजरमधून वापरता येत नाही. HalloApp वर तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारखाच अनुभव मिळेल, फक्त जवळच्या मित्र आणि कुटुंबियांशी जोडले जाऊ शकता.  

Web Title: Whatsapp ex employee neeraj arora launched halloapp for android ios private social network application news 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.