WhatsApp वर आता पाठवलेला मेसेज 7 दिवसानंतर देखील करता येणार Delete for Everyone!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 07:21 PM2021-11-24T19:21:13+5:302021-11-24T19:21:18+5:30
WhatsApp च्या Delete for everyone फिचरमधील मोठा बदल दिसून आला आहे. सध्या डेव्हलपमेंटमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.
WhatsApp वर पाठवलेले मेसेज रिसिव्हरच्या फोनमधून डिलीट करण्यासाठी Delete For Everyone हे फिचर देण्यात आले आहे. परंतु या फिचरच्या वापरला कंपनीने वेळ मर्यादा दिली आहे. सध्या 1 तास, 8 मिनिटं आणि 16 सेकंदाच्या आत पाठवलेला मेसेज रिसिव्हरच्या फोनमधून डिलीट करता येतो. परंतु लवकरच ही मर्यादा वाढवण्यात येईल. अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.
व्हॉट्सअॅप कथितरित्या सर्वांसाठी मेसेज डिलीट करण्याची वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे. सध्या असलेली सुमारे एक तासाची वेळ वाढवण्यासाठी कंपनी काम करत आहे. सध्या या अपडेटवर काम सुरु आहे आणि हे फिचर आता बीटा टेस्टरसाठी देखील उपलब्ध नाही. व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची मर्यादा कायमची रद्द करणार असल्याची बातमी याआधी आली होती. परंतु आता ही मर्यादा सात दिवसांपर्यंत वाढवण्यात येईल.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार WhatsApp Desktop beta 2.2147.4 वर मेसेज डिलीट करण्याच्या फीचरमध्ये एक नवीन अपडेट दिसला आहे. या बीटा अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवरून मेसेज डिलीट करण्याची वेळ 1 तास, 8 मिनिटं, 16 सेकंदांवरून 7 दिवस आणि 8 मिनिटं करण्याची योजना आहे. WABetaInfo ने या नव्या अपडेटचा एक स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे.