Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:50 PM2020-07-09T12:50:52+5:302020-07-09T12:51:58+5:30

भविष्यात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तीन प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी संकेत दिले होते.

whatsapp facebook and instagram can be merged facebook chief zuckerberg | Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Next

नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणाऱ्या WhatsApp, इन्स्टाग्रामवर आणि फेसबुक (Whatsapp, Instagram and Facebook)चे लवकरच विलीनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकनेव्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची मालकी मिळवली असून, ते आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण ठरले आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्रित केले जातील, अशी अटकळ बांधली जात आहे. भविष्यात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तीन प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी संकेत दिले होते.

फेसबुकचा हा थ्री-इन-प्लॅटफॉर्म 
आता फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरला एकत्र विलीन करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम वापरकर्तेसुद्धा या प्लॅटफॉर्मवर आपापसात संवाद साधू शकतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची प्रचंड लोकप्रियता पाहता असे म्हणता येईल की, फेसबुकच्या एका प्लॅटफॉर्ममधील हे तिन्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरू शकतील.

डेटाबेसची तयारी सुरू
WABetaInfoच्या अहवालाने अशा पद्धतीनं तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. WABetaInfoने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक मेसेंजर वापरून तीन प्लॅटफॉर्मवर एकच कनेक्शन तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. फेसबुक लोकल डेटाबेसमध्ये टेबल्स तयार करत आहे जे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे मेसेजेस आणि सेवा सामायिक करण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांचा वापर करून फेसबुक संपर्क क्रमांक आणि संदेश एकत्र करणार आहे. तसेच पुश नोटिफिकेशन्सचा आवाज एकत्रित यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही प्रक्रिया अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि म्हणूनच फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसह इतर प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्याची ही सुविधा किती काळात विकसित करेल हे सांगणे थोडेसे कठीण जाईल. भविष्यात ही योजना कार्यान्वित होऊ शकते हीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा

मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

Web Title: whatsapp facebook and instagram can be merged facebook chief zuckerberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.