सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य
By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2021 03:31 PM2021-06-04T15:31:03+5:302021-06-04T15:32:32+5:30
Government giving free data: WhatsApp वर हा खोटा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकार मोफत इंटरनेट देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
टेक्नॉलॉजीमुळे आपले आयुष्य सुखकर झाले आहे, परंतु काही लोक या टेक्नॉलॉजीचा वापर चुकीच्या कामांसाठी करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या रोजच येत असतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. एक खोटा व्हाट्सअॅप मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि सरकार तीन महिन्यांसाठी 100 मिलियन म्हणजे 10 कोटी युजर्सना मोफत इंटरनेट देत आहे. प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) ने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. (Fake WhatsApp message claims free internet for three months)
धोखाधड़ी से सावधान!#WhatsApp मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 3 महीने के लिए 100 मिलियन उपयोगकर्ताओं को मुफ्त इंटरनेट सुविधा प्रदान कर रही है।#PIBFactCheck: यह दावा व लिंक #फ़र्ज़ी है। भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गयी है। ऐसे फ़र्ज़ी वेबसाइट से सतर्क रहें। pic.twitter.com/08iUNUbEOM
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 1, 2021
PIB ने 1 जूनला फसव्या व्हाट्सअॅप मेसेजबाबतची माहिती ट्वीट केली. या ट्विटसोबत एक छोटासा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे कि, सरकार मोफत इंटरनेट देत आहे आणि हि ऑफर 29 जूनपर्यंत Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) युजर्ससाठी उपलब्ध आहे. मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात येते. या लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडते. या वेबसाइटवर तुम्हाला तुमची खाजगी माहिती टाकून सबमिट करावी लागते. परंतु, असे केल्याने तुमची खाजगी माहिती भरावी चुकीच्या लोकांच्या हातात पडू शकते, त्यामुळे अश्या कुठल्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे.
अश्याप्रकारचे फसवे मेसेज सतत व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एक मेसेज व्हायरल झाला होता, ज्यात WhatsApp Pink मिळवण्याचा दावा केला गेला होता, जो हॅकर्सना युजर्सच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळवून देत होता. अश्या मेसेजेसना आळा घालण्याचा सोप्पा उपाय म्हणजे तुम्हाला आलेल्या मेसेजची खात्री न करता तो पुढे पाठवणे बंद करणे.