सावधान! व्हॉट्सअॅपवर आलेला 'हा' मेसेज चुकूनही उघडू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 03:30 PM2018-05-04T15:30:12+5:302018-05-04T15:30:12+5:30
व्हॉट्सअॅपवर एक असा मेसेज फिरतो आहे जो उघडल्यावर व्हॉट्सअॅप काही वेळासाठी फ्रीझ होत आहे.
मुंबई- व्हॉट्सअॅपवर फेक मेसेज येण्याची संख्या फार आहे. काही मेसेज असे असतात जे उघडल्यावर फोन हँग होतो किंवा अॅप्लिकेशन काही वेळासाठी बंद होतं. पण सध्या व्हॉट्सअॅपवर एक असा मेसेज फिरतो आहे जो उघडल्यावर व्हॉट्सअॅप काही वेळासाठी फ्रीझ होत आहे. व्हॉट्सअॅप युजर्सकडून अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत.
फॉरवर्ड केल्या जात असलेल्या मेसेजमुळे कुठलाही धोका नाही. कुणीतरी मस्करीत हा मेसेज तयार केल्याचं बोललं जातं आहे. एन्ड्रॉइड स्पेसिफिक हा मेसेज असल्याचं बोललं जात आहे. आयएसओ फोनवर या मेसेजचा कुठलाही परिणाम होत नाही.
'मी तुमचं व्हॉट्सअॅप थोड्यावेळासाठी हँग करू शकतो. फक्त या मेसेजच्या खाली क्लिक करा, अशा स्वरूपाचा मेसेज व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केला जातो आहे. 'डोंट टच हीअर' असं या मेसेजच्या खाली लिहिलं आहे. 'डोंट टच हीअर' या अक्षरांना नीट पाहिलं तर तेथे एक लपलेलं अक्षर दिसेल. ब्लॅक स्पेसप्रमाणे हे अक्षर आहे. यामुळे व्हॉट्सअॅप रिस्पॉन्ड करणं बंद करत आहे.