सावधान! हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा WhatsApp Account, 'या' सोप्या ट्रिकची होईल मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:37 PM2022-01-28T14:37:58+5:302022-01-28T14:46:44+5:30

WhatsApp News : हॅकर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निशाणा करण्यास सुरुवात केली आहे.

whatsapp fraud whatsapp help center cyber crime internet fraud | सावधान! हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा WhatsApp Account, 'या' सोप्या ट्रिकची होईल मोठी मदत

सावधान! हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा WhatsApp Account, 'या' सोप्या ट्रिकची होईल मोठी मदत

googlenewsNext

नवी दिल्ली - इंटरनेटच्या जगात सायबर हॅकर्स विविध पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. अनेकांची फसवणूक होते आहे. एक छोटीशी चूकही फ्रॉडसाठी (Online Fraud) कारणीभूत ठरू शकते. यामुळे बँक अकाऊंटला धोका निर्माण होतो. अकाऊंट रिकामं होऊ शकतं. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती लीक होते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रेडिंग करताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

हॅकर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निशाणा करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास सर्वच जण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. सायबर क्रिमिनल्स नव्या-नव्या पद्धतीने लोकांना टार्गेट करत आहेत. जर तुम्हाला तुमच्या WhatsApp अकाऊंटमध्ये काही चुकीच्या किंवा संशयास्पद, तुम्ही न केलेल्या गोष्टी दिसत असतील तर तुमचं अकाऊंट हॅक झाल्याचं समजावं. इतर दुसरा कोणी व्यक्ती अकाऊंटचा वापर करत असून त्याद्वारे अकाऊंट हँडल केलं जातं.

WhatsApp आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी नवे अपडेट, सिक्योरिटी फीचर्स देत असतं. WhatsApp असेही काही फीचर्स देतं ज्याद्वारे तुमच्या अकाऊंटचा चुकीचा वापर होत नाही ना याची माहिती मिळवता येते.

कॉल हिस्ट्री 

वेळोवेळी WhatsApp Activity चेक करणं गरजेचं आहे. कॉल हिस्ट्री तपासणंही आवश्यक आहे. एखादा असा कॉल नाही ना ज्याची तुम्हाला माहिती नाही. अनोळखी कॉल, मेसेज आणि लिंकवर क्लिक करू नका. तुमची पर्सनल माहिती कोणताही देऊ नका.

कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन

WhatsApp Account मध्ये कॉन्टॅक्टची माहिती ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा हॅकर्स अकाऊंट हॅक केल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये बदल करण्यास सुरुवात करतात. जर तुम्हाला अकाऊंटमध्ये अचानक असे काही बदल दिसल्यास अलर्ट व्हा.

Linked Device

WhatsApp मध्ये Linked Device नावाने एक ऑप्शन दिला जातो. इथे तुमच्या अकाऊंटशी इतर कोणतं अकाउंट लिंक नाही ना हे सहजपणे तपासू शकता. जर असं अकाऊंट आढळलं तर ते लगेच डिलीट करा.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन 

WhatsApp अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा दिली आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर नव्या डिव्हाइसमध्ये WhatsApp लॉगइन केल्यास OTP मागितला जाईल. तो ओटीपी नंबर टाकून तुम्ही अकाऊंट ओपन करू शकता. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अधिक सुरक्षित होण्यास मदत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: whatsapp fraud whatsapp help center cyber crime internet fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.