Stickerनंतर आता WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 09:02 PM2018-11-15T21:02:16+5:302018-11-15T21:02:27+5:30

WhatsApp म्हणजे जीवनाचा आता एक अविभाज्य भाग झालंय. सकाळीच उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहिलं जातं.

whatsapp to get instagram like feature soon | Stickerनंतर आता WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, जाणून घ्या खासियत

Stickerनंतर आता WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, जाणून घ्या खासियत

Next

नवी दिल्ली- WhatsApp म्हणजे जीवनाचा आता एक अविभाज्य भाग झालंय. सकाळीच उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहिलं जातं. त्यामुळे व्हॉट्सअॅप अल्पावधीतच वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय झालं आहे. तसेच व्हॉट्सअॅप नवनवे फीचर उपलब्ध करून देत असल्यानं यूझर्सच्याही पसंतीस उतरत आहे. व्हॉट्सअॅपनं हल्लीच Sticker हे फीचर आणलं असून, व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामसारखं फीचर उपलब्ध करून देणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कॉन्टॅक्ट अॅड करण्यास मदत होणार आहे.

या फीचरचं नाव "Share Contact Info via QR" असणार आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही QR कोड स्कॅन करून दुसरे कॉन्टॅक्ट अॅड करू शकणार आहात. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर एकदम इन्स्टाग्राममधल्या Nametag फीचरसारखं आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्ते या युनिक QR कोडच्या माध्यमातून एकमेकांना अॅड करू शकतील. WaBetaInfoनुसार, QR कोडमुळे व्हॉट्सअॅपला स्वतःला कॉन्टॅक्ट यादीच्या स्वरूपात घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच Sticker हे फीचर वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आता हे नवं फीचर आणून व्हॉट्सअॅपनं तंत्रज्ञानाच्या जगतात धुमाकूळ घातला आहे.

WhatsAppनं 2018च्या सुरुवातीपासूनच यूजर्ससाठी नवनवे फीचर्स ग्राहकांच्या सेवेत आणण्याचा धडाका लावला आहे. आता एक पाऊल पुढे टाकत WhatsApp आणखी पाच फीचर्स ग्राहकांसाठी आणणार आहे. सध्या तरी हे फीचर्स बिटा वर्जनमध्ये देण्यात आले आहेत. तसेच लवकरच व्हॉट्सअॅपकडून ग्राहकांसाठी नवे अपडेट्स येण्याची चिन्हे आहेत. या फीचर्समध्ये प्रायव्हेट रिप्लाय, व्हेकेशन मोड, लिंक्ड सोशल मीडिया अकाऊंट्स, इनलाइन इमेज आणि सायलेंड मोडचा समावेश आहे. कंपनीनं स्टिकर फीचर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रायव्हेट रिप्लाय फीचरची सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. या फीचर्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटमध्येही तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय करू शकता. या फीचरच्या मदतीनं ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही अडचणीविना एक युजर्स दुस-या युजर्सशी चाट करू शकतो. व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे मेसेज पाहण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लाय ऑप्शन वापरू शकता. सध्या तरी हे फीचर बिटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: whatsapp to get instagram like feature soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.