जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 07:12 PM2023-04-19T19:12:41+5:302023-04-19T19:12:58+5:30

आता वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर फक्त एका बटणाच्या टॅपवर शेअर करू शकतात.

whatsapp gets new facebook sharing option for status and here is how it works | जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार

जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार

googlenewsNext

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp प्रत्येकवेळी नवीन फिचर अपडेट करत असते. याद्वारे वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि सुरक्षित चॅटिंग अनुभव मिळतो. आता आणखी एक नवे फिचर अपडेट झाले आहे. याद्वारे Facebook आणि Whatsapp एकमेकांशी जोडले आहे. व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त मेटाच्या मालकीच्या अॅप्समध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही समावेश आहे. आता वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर फक्त एका बटणाच्या टॅपवर शेअर करू शकतात.

पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली

इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांची स्टोरी फेसबुकवर शेअर करण्याचा सोपा पर्याय दिला आहे, आता अशीच संधी व्हॉट्सअॅप स्टेटसवरही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस प्रमाणे, फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टोरी देखील २४ तासासाठी शेअर ेकली जाऊ शकते. व्हॉट्सअॅपने एका नवीन घोषणेमध्ये म्हटले आहे की, आता फेसबुक स्टोरीजमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस आपोआप शेअर केले जाईल आणि फेसबुकवर सेटिंग सक्षम केल्यानंतर असा पर्याय उपलब्ध होईल.

व्हॉट्सअॅपने स्टेटसमध्ये एक नवीन बटण दिले आहे. जे सध्या माय स्टेटससह दिसत असलेल्या शेअर आयकॉनसह दिसेल. या बटणावर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवरही शेअर करता येईल. एवढेच नाही तर यूजर्सना हवे असल्यास फेसबुक स्टोरीमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस आपोआप शेअर करण्याचा पर्यायही निवडता येईल. 

असं करा वापरा फिचर 

नवीन अपडेट मिळाल्यानंतर, सर्व वापरकर्त्यांना अगोदर WhatsApp वर कोणतेही स्टेटस ठेवावे लागेल आणि नंतर खाली दिलेल्या नोटीफिकेशनवर क्लिक करा.

व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर केल्यानंतर फेसबुक स्टोरी सेक्शनमध्ये शेअर करण्याचा सोपा पर्याय सेट-अप करता येईल.

'सेट-अप' पर्यायावर टॅप केल्यानंतर, ऑन-स्क्रीन सूचनांचे अनुसरण करा.

ऑप्शन सेट केल्यानंतर, पुढच्या वेळी तुम्ही व्हॉट्सअॅपवर जे स्टेटस शेअर कराल, ते फेसबुक स्टोरीमध्येही दाखवले जाईल. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे फिचर ठेवू  शकता.

Web Title: whatsapp gets new facebook sharing option for status and here is how it works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.