पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर 

By सिद्धेश जाधव | Published: December 13, 2021 11:55 AM2021-12-13T11:55:14+5:302021-12-13T11:55:32+5:30

WhatsApp वरील युजर्सचं ऑनलाईन स्टेट्स कॉन्टॅक्टमध्ये नसलेल्या लोकांनाही थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळतं. परंतु लवकरच हे बदलणार आहे, यासाठी कंपनीनं नवीन फिचर बीटा व्हर्जनमध्ये आणलं आहे.  

Whatsapp gets new privacy feature to restrict third party apps to track your last seen or online status | पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर 

पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर 

googlenewsNext

WhatsApp सतत नवनवीन फिचर सादर करतं. त्यामुळे या लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजरची लोकप्रियता टिकून आहे. परंतु अन्य लोकप्रिय अ‍ॅप्स प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील दोष आहेत. या अ‍ॅपमध्ये Last Seen आणि Online स्टेटस असं एक फिचर आहे, ज्याचा वापर काही लोक पाळत ठेवण्यासाठी दुरुपयोग करतात. आता या दोषावर एक उपाय येत आहे, जो व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसला आहे.  

लास्ट सिन आणि ऑनलाईन स्टेट्सच्या मदतीनं स्टॉकर्स (पाळत ठेवणारे) थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजरचे WhatsApp टाइम लॉग मिळवतात. या टाइम लॉगच्या मदतीनं कोणत्याची व्हॉट्सअ‍ॅप युजरचं स्टेटस ट्रॅक करता येतं. या दोषाची माहिती काही युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप फोरमवर दिली होती, त्यामुळे कंपनीनं आता नवीन फीचर सादर केलं आहे. 

WhatsApp युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील फक्त त्या युजर्सचं ऑनलाइन स्टेटस आणि लास्ट सीन स्टेटस दिसतं ज्यांच्याशी आपण कधी तरी चॅट केलं आहे. मग भलेही दोन्ही युजर एकाच वेळी ऑनलाइन असो. परंतु काही थर्ड पार्टी अ‍ॅप्स तुमच्या ऑनलाइन स्टेटसचा लॉग अ‍ॅक्सेस करू शकतात आणि इतर कोणालाही ही माहिती देतात. तो युजर तुम्ही आता ऑनलाईन आहात कि नाही किंवा कधी ऑनलाईन होता याची माहिती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसून सुद्धा मिळवू शकतो. 

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर नव्या WhatsApp बीटा व्हर्जनमध्ये दिसलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर आपल्या व्हॉट्सअ‍ॅप टाइम लॉगचा अ‍ॅक्सेस कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपला देणं बंद करू शकतील. यासाठी WhatsApp नं एक सेफगार्ड फीचर आणलं आहे, जे युजरचं लास्ट सीन किंवा ऑनलाइन स्टेटस थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ट्रॅक करू देणार नाही. सध्या बीटा व्हर्जनमध्ये असलेलं हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.  

Web Title: Whatsapp gets new privacy feature to restrict third party apps to track your last seen or online status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.