WhatsApp वर तुम्हीही Good Morning वाले मेसेज पाठवता? मग तुमचंही अकाऊंट होऊ शकत बॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:33 PM2022-10-19T17:33:36+5:302022-10-19T17:34:39+5:30
तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं.
नवी दिल्ली-
तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं. एका अहवालानुसार वारंवार ज्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरुन गुडमॉर्निंग, गुडनाइटचे मेसेजेस पाठवले जातात असा अकाऊंट्सना स्पॅम अकाऊंट म्हणून ग्राह्य धरलं जाण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्ही तर एखादा चुकीचा मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड केला तरी तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं.
आपण अनेकदा भारतीय व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आल्याची बातमी ऐकलीच असेल. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपकडून बंदीची कारवाई करण्यात येते. तुमचं अकाऊंट कोणकोणत्या कारणांमुळे बॅन केलं जाऊ शकतं याची अनेक कारणं WhatsApp ने शेअर केली आहेत.
जर तुम्ही सर्वच मेसेज जास्तीज जास्त लोकांना फॉरवर्ड करत असाल तर तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. त्यामुळे मेसेजेस फॉरवर्ड करण्यावर आपण स्वत:च बंधन घालणं गरजेचं आहे. ज्या मेसेजची सत्यता तुम्हाला माहित नाही असे मेसेज फॉरवर्ड करणं टाळलं पाहिजे. तसंच चुकीचा संदेश देणारे मेसेजेसही फॉरवर्ड करुन नयेत. त्यामुळे अकाऊंटवर बंदी घातली जाऊ शकते.
फिचर्सचा चुकीचा वापर करू नका
WhatsApp च्या ब्रॉडकास्ट फीचरचा चुकीचा वापर केल्यास तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. या फिचरचा उपयोग एकाचवेळी अनेकांना मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. पण तुम्ही चुकीचा मेसेज पाठवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तसंच ज्या व्यक्तींना तुम्ही मेसेज पाठवत आहात त्यांच्याकडे तुमचा मोबाइल नंबर सेव्ह असणं गरजेचं आहे.
तुम्ही जर एखाद्याच्या परवानगीविना त्याला एखाद्या ग्रूपमध्ये अॅड करत असाल तरीही तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार एखादा व्यक्ती जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यापासून रोखत असेल तर अशा व्यक्तींना त्रास देऊ नका अन्यथा अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्याची नामुष्की ओढावेल. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे WhatsApp च्या पॉलिसीची उल्लंघन करू नका. यामुळे तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकते. तसंच कंपनीकडून चुकून तुमचं अकाऊंट बॅन केलं गेलं असेल तर तुम्ही त्याविरोधात अपील करू शकता.