WhatsApp New Feature: WhatsApp लाँच करणार धमाकेदार फिचर! गुगल Meet अन् Zoom वाल्यांचे 'टेन्शन' वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:28 PM2023-02-28T16:28:09+5:302023-02-28T16:31:42+5:30

WhatsApp च्या नव्या फिचरमुळे अनेक गोष्टी आणखी सोप्या होणार...

whatsapp group call schedule feature soon to launch competition to google meet zoom call | WhatsApp New Feature: WhatsApp लाँच करणार धमाकेदार फिचर! गुगल Meet अन् Zoom वाल्यांचे 'टेन्शन' वाढणार

WhatsApp New Feature: WhatsApp लाँच करणार धमाकेदार फिचर! गुगल Meet अन् Zoom वाल्यांचे 'टेन्शन' वाढणार

googlenewsNext

WhatsApp New Feature: WhatsApp कडून लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्यात येणार आहे. हे फीचर युजर्सना ग्रुप कॉलबद्दल काही खास सुविधा देणार असल्याचं सांगितलं जातंय. आत्तापर्यंत हे फीचर Google Meet आणि Zoom सारख्या व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मवर होते. पण हे फीचर लवकरच WhatsApp कडून सादर केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत गुगल मीट आणि झूमचे टेन्शन वाढले आहे, कारण जर व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलिंगचे हे फीचर लाइव्ह झाले तर गुगल मीट आणि झूमचे वापरकर्ते झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.

 नवीन फिचर कसे असेल?

WABetainfo च्या रिपोर्टनुसार, अॅप डेव्हलपर एका नवीन बटणावर काम करत आहेत, ज्याच्या मदतीने यूजर्स ग्रुप कॉलिंग शेड्यूल करू शकतील. टेस्टफ्लाइट प्रोग्राममध्ये नावनोंदणी केलेल्या आणि WhatsApp बीटा आवृत्ती 23.4.0 वापरत असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे. सध्या तुम्ही कॉल करत असाल तर तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे, त्याचे नाव निवडावे लागेल. पण लवकरच व्हॉट्सअॅपवर एक स्वतंत्र ग्रुप बटण उपलब्ध होईल, ज्यावर टॅप करून कॉलिंग मेसेज शेड्यूल करता येईल. या कॉलिंग मेसेजची सूचना ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या सर्व युजरना पाठविली जाईल. अशा परिस्थितीत, ग्रुप युजरर्सना समजेल की मीटिंग कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी आहे. WhatsApp चे नवीन फीचर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही मोडसाठी असेल. ग्रुप कॉलिंग शेड्यूल फीचरमध्ये मीटिंग रिमाइंडरचे फीचर देखील उपलब्ध असणार आहे, ज्याच्या मदतीने युजर्स वेळेपूर्वी मीटिंगसाठी तयार होण्याची आठवण करून दिली जाऊ शकेल.

WhatsApp ने या आधीही लाँच केलंय एक वेगळं फिचर

अलिकडच्‍या आठवड्यात WhatsApp ने अनेक उत्तम फीचर्स आणले आहेत. यात व्हिडिओ कॉलिंगसाठी पिक्चर इन पिक्चर मोडचा समावेश आहे, जो iOS वापरकर्त्यांसाठी आणला गेला आहे. तसेच फॉरवर्ड मीडिया आणि कॅप्शन फीचर या सोयीही देण्यात आल्या आहेत.

Web Title: whatsapp group call schedule feature soon to launch competition to google meet zoom call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.