WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आता चालणार तुमच्या आवाजाची जादू; आलं नवं दमदार फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:29 AM2023-08-07T11:29:43+5:302023-08-07T11:30:45+5:30
WhatsApp Group Voice Chat Feature : WhatsApp ने ग्रुप व्हॉईस कॉल फीचर आणलं आहे. त्याच्या मदतीने युजर्सना टाइप करण्याची आवश्यकता नाही.
WhatsApp ने ग्रुप व्हॉईस कॉल फीचर हे नवीन फीचर लाँच केले आहे. त्याच्या मदतीने युजर्सना टाइप करण्याची गरज नाही. यामुळे पर्सनल चॅटिंगचा अनुभव मिळेल. हे फीचर सर्वप्रथम अँड्रॉइड युजर्ससाठी आणले जाईल. यामध्ये चॅट आणि WhatsApp ग्रुप कनेक्ट करण्याचा पर्याय असेल. ज्यांना ऐकण्याचा आणि दिसण्याचा त्रास असेल त्या लोकांसाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.
युजर्सच्या सोयीसाठी WhatsApp ने ग्रुप व्हॉईस कॉल फीचर आणलं आहे. त्याच्या मदतीने युजर्सना टाइप करण्याची आवश्यकता नाही. हे पर्सनल चॅटिंग अनुभवाची अनुभूती देईल जिथे लोक तुमच्या आवाजात तुमचं चॅट एक्सेस करू शकतील. विशेषत: ज्या युजर्सना ऐकण्यात आणि दिसण्यात अडचण आहे त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरेल. व्हॉईस चॅटिंगची सुविधा आधीच अस्तित्वात आहे मात्र ग्रुप व्हॉईस चॅटिंग फीचर यापेक्षा वेगळे असेल.
#Meta-owned messaging platform #WhatsApp is rolling out a new voice chat feature for group conversations on Android beta. pic.twitter.com/bnw8E8f98f
— IANS (@ians_india) August 7, 2023
Whatsapp चं नवीन दमदार फीचर
IANS च्या रिपोर्टनुसार, मेटा मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ग्रुप संभाषणांसाठी एक नवीन व्हॉईस चॅट फीचर लाँच करणार आहे. हे फीचर सर्वप्रथम अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल. यानंतर ते iOS युजर्ससाठी आणलं जाईल.
ट्विटर स्पेसला मिळणार टक्कर
हे फीचर व्हॉईस चॅटपेक्षा वेगळे असेल. हे ट्विटर स्पेससारखे असेल, जिथे कोणताही युजर ग्रुप व्हॉईस कॉलिंगमध्ये भाग घेऊ शकतो. तथापि, ट्विटर स्पेसमध्ये कोणीही तुमाला जॉईन होऊ शकतं. परंतु हा एक खासगी चॅट प्लॅटफॉर्म असेल, जेथे ग्रुपमधील मर्यादित लोक या व्हॉइस चॅटचा भाग बनू शकतील.
नवीन फीचर कसं करणार काम
कोणताही WhatsApp ग्रुप य़ुजर व्हॉइस ग्रुप कॉल करू शकेल. त्याच WhatsApp युजर्सना कनेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. तेच युजर्स स्वतःला WhatsApp ग्रुप कॉलमध्ये कनेक्ट करू शकतील. गप्पांमध्ये गंमत नसेल तर लीव करण्याचा पर्यायही असेल. हा चर्चेचा नवा मंच बनू शकतो. यामध्ये WhatsApp ग्रुप चॅटचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच, युजर्स त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.