Whatsapp देणार 1000GB फ्री डेटा, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 01:44 PM2019-07-30T13:44:03+5:302019-07-30T14:29:09+5:30

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

whatsapp happy birthday scam message going viral be alert from messages offering 1000gb free internet data | Whatsapp देणार 1000GB फ्री डेटा, जाणून घ्या सत्य

Whatsapp देणार 1000GB फ्री डेटा, जाणून घ्या सत्य

Next
ठळक मुद्देसध्या व्हॉट्सअ‍ॅप 1000GB इंटरनेट डेटा फ्री देणार असा एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वाढदिवसानिमित्त युजर्सना 1000GB डेटा फ्री देणार अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे.फ्री इंटरनेट डेटासाठी मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा व्हिडीओ, फोटो शेअर करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे एखादा मेसेजही व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने झटपट व्हायरल होतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप 1000GB इंटरनेट डेटा फ्री देणार असा एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा आहे. व्हॉट्सअ‍ॅप अशापद्धतीने डेटा फ्री देत नाही. 

व्हॉट्सअ‍ॅपला यावर्षी 10 वर्षे पूर्ण झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन हा मेसेज व्हायरल करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वाढदिवसानिमित्त युजर्सना 1000GB इंटरनेट डेटा फ्री देणार अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. फ्री डेटासाठी मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास एक पेज ओपन होतं. यामध्ये ऑफरबाबत माहिती देण्यात आली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फ्री इंटरनेट डेटाची माहिती कशी मिळाली याबाबत काही प्रश्न विचारले जातात. तसेच त्याच्या उत्तरासाठी काही पर्याय देण्यात आले आहेत. तसेच 1000GB डेटा फ्री हवा असल्यास हा मेसेज 30 व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना फॉरवर्ड करा असं सांगितलं जातं. मात्र अशा पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप कोणतीही ऑफर देत नसल्याने लिंकवर क्लिक करू नका तसेच हा फेक मेसेज इतरांना फॉरवर्ड देखील करू नका. कारण या गोष्टीमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता ही अधिक असते. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'

व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अ‍ॅड करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत. 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.

use this trick to go invisible if you want to take a break from whatsapp | WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं

व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने मेसेज येत असतात. मात्र त्यातील काही मेसेज हे डिलीट केले जातात. हे डिलीट केलेल मेसेज वाचता येत नाहीत. पण काही ट्रिक्सचा वापर केल्यास हे मेसेज युजर्सना वाचता येतात. व्हॉट्सअ‍ॅपवर जे मेसेज डिलीट केले जातात ते फोनमध्ये स्टोर होतात. अ‍ॅपच्या रिकव्हरी फीचरच्या मदतीने हे मेसेज रिकव्हर केले जातात. चॅट हिस्ट्री ही व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवर स्टोर नसते. चॅट मेसेजचा बॅकअप असतो. तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी स्टोर केले जातात. जर चुकून रिसीव्ह केलेला मेसेज डिलीट केला तर तो सहजपणे व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॅकअप पर्यायमध्ये रिकव्हर केला जाऊ शकतो. 

Web Title: whatsapp happy birthday scam message going viral be alert from messages offering 1000gb free internet data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.