व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार 'हे' खास फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:55 PM2018-11-01T15:55:37+5:302018-11-01T16:08:15+5:30

व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन खास फीचर आणत असतं.

whatsapp has introduced a new feature private message | व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार 'हे' खास फीचर

व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार 'हे' खास फीचर

Next

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपने त्यांच्या अॅऩ्ड्रॉईड बीटा युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. नव्या अपडेटसह आलेल्या या फीचरच्या माध्यमातून युजर्सना ग्रुप चॅटमध्ये Private Reply चा खास पर्याय मिळणार आहे. 

Private Reply फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्स ग्रुप चॅटच्या दरम्यान कोणत्याही एका व्यक्तीला वेगळा मेसेज, व्हॉइस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करता येणार आहे.  यासाठी ग्रुपमधून बाहेर येण्याची गरज नाही. या फीचरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले मेसेज हे केवळ पाठवणारा आणि ज्याला ते मेसेज पाठवण्यात आले आहे ती व्यक्तीच ते पाहू शकते. ग्रुपमधील इतर सदस्यांना हे मेसेज मिळणार नाहीत. 

Private मेसेज पाठवण्यासाठी आधी तो मेसेज सिलेक्ट करावा लागेल. सिलेक्ट केल्यानंतर ग्रुप चॅटमध्ये वरती असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कॉपी, मेसेज, व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल असे चार पर्याय मिळतील. त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडू शकता. उदाहरणार्थ तुम्ही जर मेसेज हा पर्याय निवडला तर तुम्ही ग्रुप चॅटमधून बाहेर जाऊन आपोआप ज्या व्यक्तीसोबत चॅट करू इच्छिता त्यांच्या चॅट बॉक्समध्ये पोहोचाल. 

Web Title: whatsapp has introduced a new feature private message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.