WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 09:09 PM2022-11-15T21:09:21+5:302022-11-15T21:10:18+5:30

WhatsApp India Head Resigns : या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता.

whatsapp india head abhijit bose resigns, meta india public policy head rajiv aggarwal step down | WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

Next

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप इंडिया (WhatsApp India) या मेसेजिंग अ‍ॅपचे प्रमुख असलेले अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल (Rajiv Aggarwal) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवनाथ ठुकराल यांची व्हॉट्सअ‍ॅप इंडियासह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंटचे प्रमुख होते. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने अलीकडेच आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. दुसरीकडे, या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता.

अभिजित बोस यांच्या राजीनाम्याची माहिती देताना व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट ( Will Cathcart) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने अभिजित बोस यांचे आभार मानू इच्छितो. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे पहिले प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. त्यांनी आमच्या सेवा लोकांना अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील करोडो लोकांना आणि व्यवसायांना याचा फायदा झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप इंडिया भारतात व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत राहील. यासोबतच लवकरच व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या पुढील प्लॅनिंगबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, परंतु मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांच्याबद्दल कंपनीने सांगितले की, त्यांनी एका चांगल्या संधीच्या शोधात राजीनामा दिला आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप इंडियाने दोघांनाही चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुक इंडियाच्या प्रमुखानेही दिलाय राजीनामा
यापूर्वी, फेसबुकची (Facebook) पेरेंट कंपनी मेटा इंडियाचे (Meta India) भारतातील प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही 3 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या राजीनाम्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये (Social Media Platform Snapchat) सामील होणार आहेत. मोहन हे आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील.

Web Title: whatsapp india head abhijit bose resigns, meta india public policy head rajiv aggarwal step down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.