जगभरात WhatsApp, Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात तांत्रिक समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 00:16 IST2024-04-04T00:13:43+5:302024-04-04T00:16:02+5:30
फक्त व्हॉट्सअपच नाही तर काही युजर्सना मेटा इन्स्टाग्राम APP मध्येही तांत्रिक समस्या जाणवत आहे

जगभरात WhatsApp, Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात तांत्रिक समस्या
मुंबई - जगभरातील लोकप्रिय मेसेंजर APP व्हॉट्सअप बुधवारी रात्री ११.४५ वाजता डाऊन झाले आहे. अनेक युजर्सना व्हॉट्सअप लॉगिन करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्सचे मेसेज सेंड होत नाही.
फक्त व्हॉट्सअपच नाही तर काही युजर्सना मेटा इन्स्टाग्राम APP मध्येही तांत्रिक समस्या जाणवत आहे. मेटा-मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपला भारतात मोठ्या प्रमाणावर आउटेजचा सामना करावा लागत आहे आणि आउटेज ट्रॅकर डाउन डिटेक्टरवर भारतात 8000 हून अधिक रिपोर्ट आले आहेत.