Voice Call मुळे ग्रुप मेंबर्सना होणार नाही त्रास; WhatsApp चं आणखी एक धमाकेदार फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:25 PM2023-11-14T12:25:58+5:302023-11-14T12:29:07+5:30
WhatsApp चं हे नवीन व्हॉईस चॅट फीचर आहे. हे व्हॉईस कॉल फीचर मोठ्या ग्रुपसाठी डिझाइन केलं गेलं आहे, जे लोकांना डिस्टर्ब होण्यापासून रोखेल.
WhatsApp मध्ये एक नवीन फीचर येणार आहे, ज्याच्या मदतीने युजर्सचा चॅटिंगचा अनुभव बदलेल. या लेटेस्ट अपडेटचा उद्देश युजर्सची प्रायव्हसी अधिक चांगलं करणं हा आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल. WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.
WhatsApp चं हे नवीन व्हॉईस चॅट फीचर आहे. हे व्हॉईस कॉल फीचर मोठ्या ग्रुपसाठी डिझाइन केलं गेलं आहे, जे लोकांना डिस्टर्ब होण्यापासून रोखेल. हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये आधीच दिसलं आहे आणि आता या फीचरला ऑफिशियली कन्फर्म करण्यात आलं आहे. लवकरच त्याचे अपडेट सर्वांपर्यंत पोहोचेल.
WhatsApp चे हे फीचर थोडे वेगळ्या पद्धतीने काम करेल. वास्तविक, या लेटेस्ट अपडेटमध्ये, मोठ्या ग्रुपमधील 32 सहभागींसह ग्रुपची व्यवस्था केली जाऊ शकते. ग्रुप कॉलमध्ये प्रत्येकाला रिंग करण्याऐवजी काही लोकांना पूश नोटिफिकेशन मिळेल.
rolling out now: voice chat for your larger groups!
— WhatsApp (@WhatsApp) November 13, 2023
you’ll soon have the option to talk it out live with whoever can join or keep texting with whoever can’t
एकदा कॉलमध्ये सामील झाल्यानंतर, युजर्सना टॉपमध्ये कॉल कंट्रोल्स मिळेल. या कॉल्स दरम्यान, यामध्ये टेक्स्ट मेसेज, फोटो सेंड करता येतील. पर्सनल चॅटिंग करता येईल. हे व्हॉईस चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड फॉरमॅटमध्ये असेल, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने एक खास फीचर आहे.
WhatsApp च्या या अपकमिंग फीचर अपडेट iOS आणि Android या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे फीचर केवळ त्या गटांमध्ये कार्य करेल, ज्यामध्ये 33 ते 128 सहभागी असतील. भारतासह जगभरात WhatsApp चे अब्जावधी युजर्स आहेत. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक या App चा वापर करतात. या App द्वारे ते मित्र आणि नातेवाईक यांच्याशी कनेक्ट राहतात.