कमाल! आता WhatsApp चॅटमध्ये पाठवू शकता Animated Avatar; आलं जबरदस्त नवीन फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:57 PM2023-08-02T14:57:27+5:302023-08-02T14:58:09+5:30
WhatsApp चे हे फीचर सध्याच्या अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल.
WhatsApp मध्ये एक नवीन फीचर आणण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने युजर्सचा चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होईल. Animated Avatar Pack असं या लेटेस्ट फीचरचं नाव आहे, ज्यामध्ये युजर्स चॅटिंग दरम्यान एनिमेटेड अवतार वापरू शकतील. या लेटेस्ट अपडेटची माहिती WhatsApp च्या अपकमिंग फीचर्सना ट्रॅक करणाऱ्या Wabetainfo ने शेअर केली आहे.
WhatsApp चे हे फीचर सध्याच्या अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. हे फीचर सध्या WhatsApp बीटा Android 2.23.16.12 व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. म्हणूनच हे फीचर काही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे, जे बीटा टेस्टर आहेत. या लेटेस्ट फीचरसाठी बीटा युजर्सना Google Playstore वरून लेटेस्ट बीटा व्हर्जन अपडेट करावं लागेल.
Wabetainfo ने एक एनिमेटेड इमेज शेअर केली आहे, जी अवतार व्हर्जन दाखवते. कोणाशीही चॅट करत असताना युजर्स त्यांचा एनिमेटेड अवतार सहज पाठवू शकतील. Wabetainfo ने या फीचरबद्दल याआधी देखील सांगितले आहे, त्यांनी सांगितले की हे फीचर अजूनही विकसित केले जात आहे आणि अनेक डायनॅमिक घटक अवतारात दिसत आहेत.
WhatsApp मध्ये हे फीचर वापरण्यासाठी युजर्सला चॅटिंगमध्ये जाऊन अवतार टॅबवर जावे लागेल. जर अवतारासाठी काही एनिमेशन्स असतील तर याचा अर्थ युजर्सना या एनिमेशन अवतारची सुविधा मिळाली आहे. ज्या युजर्सकडे हे फीचर इनेबल नाही. ते देखील एनिमेशन अवतार रिसीव्ह करू शकतात. याचाच अर्थ नॉन बीटा व्हर्जन युजर्सही एनिमेटेड अवतार रिसीव्ह करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.