तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:57 AM2024-07-22T11:57:26+5:302024-07-22T11:58:50+5:30

WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता युजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावं लागणार नाही.

WhatsApp latest feature people nearby send and receive big files photos documents | तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं?

तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं?

WhatsApp आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असतं. आता कंपनी एक अतिशय उपयुक्त फीचर आणत आहे, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता युजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावं लागणार नाही.

WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये या कमाल फीचरबद्दल माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की, WhatsApp 24.15.10.70 iOS साठी बीटा मध्ये विकसित केलं जात आहे. या फीचरबद्दल, रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की आयफोनवर People Nearby हे फीचर नंतर उपलब्ध होऊ शकतं.

हे फीचर कसं करतं काम? 

WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हे स्पष्टपणे दर्शविलं आहे की फाइल iOS मेकॅनिझममध्ये शेअर करण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. हे कॉन्टॅक्ट्स आणि WhatsApp अकाऊंटमध्ये फाईल शेअरिंग करण्यासाठी मदत करेल. ज्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे अशा भागात हे फीचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि युजर्सना त्यांचा डेली डेटा वाचवण्यासही मदत होणार आहे.

सध्या हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे आणि लवकरच हे फीचर Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करू शकतं. या फीचरची एक खास गोष्ट अशी आहे की, यामध्ये तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दिलं जाईल जेणेकरुन फक्त रिसीव्हर माहिती घेऊ शकेल. मात्र, हे फीचर कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: WhatsApp latest feature people nearby send and receive big files photos documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.