WhatsApp च्या या फिचरमुळे आपोआप वाचणार तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज; जाणून घ्या कसे वापरायचे हे फिचर
By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 05:30 PM2021-08-20T17:30:06+5:302021-08-20T17:30:39+5:30
Whatsapp New feature: WhatsApp डिसअपियरिंग मेसेज फीचरचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आता तीन महिन्यानंतर पाठवलेले मेसेजेस आपोआप डिलीट होतील.
WhatsApp ने काही दिवसांपूर्वी डिसअपियरिंग मेसेज फीचर रोलआउट केले होते. या फीचरच्या मदतीने पाठवलेले मेसेज ठरविक कालावधीनंतर WhatsApp मेसेज आपोआप डिलीट होतात. यासाठी 7 दिवसांची मर्यादा देण्यात आली होती. परंतु आता या फीचरचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. एक दिवस आणि 7 दिवसांच्या पर्यायासोबत आता 90 दिवसांचा पर्याय देण्यात येईल.
व्हॉट्सअॅपसंबंधित माहिती देण्याऱ्या वेबसाईट WABetaInfo ने लोकप्रिय मेसेंजरच्या या नव्या फिचरची माहिती दिली आहे. WhatsApp 2.21.17.16 बीटा अपडेटमध्ये हे फिचर दिसले आहे. सध्या फक्त 7 दिवसांचा पर्याय उपलब्ध आहे, 24 तास आणि 90 दिवसांचे डिसअपियरिंग मेसेज पाठवण्याचा पर्याय अजूनही बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे.
हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध झाल्यावर युजर्सना चार पर्याय मिळतील, ज्यात टर्न ऑफचा ऑप्शन देखील असेल. 90 दिवसांचे डिसअपियरिंग मेसेज फिचर वापरून पाठवलेले फोटोज आणि व्हिडीओज तीन महिन्यानंतर आपोआप डिलीट होतील. त्यामुळे तुम्हाला स्वतःहून मेसेजेस डिलीट करावे लागणार नाहीत.
View Once फिचर म्हणजे काय?
View Once फिचर मिळाल्यावर युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अॅक्टिव्हेट होईल आणि पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ फक्त रिसिव्हरला फक्त एकदाच बघता येईल. मेसेज पाठवणाऱ्या युजरला मेसेज डिलिवर, सीन आणि ओपन्ड असे मेसेजचे स्टेटस दिसतील. म्हणजे रिसिव्हरने हा मेसेज उघडून बघितला कि नाही हे देखील समजेल.