व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच व्हॅकेशन मोड?; पर्सनल, ग्रुप चॅट आपोआप अर्काईव्ह होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 08:40 AM2020-09-05T08:40:11+5:302020-09-05T08:54:16+5:30

अनावश्यक चॅट्सपासून ब्रेक घेता येणार; व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच नवं फीचर

whatsapp likely to bring vacation mode that will auto archive personal and group chats | व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच व्हॅकेशन मोड?; पर्सनल, ग्रुप चॅट आपोआप अर्काईव्ह होणार 

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लवकरच व्हॅकेशन मोड?; पर्सनल, ग्रुप चॅट आपोआप अर्काईव्ह होणार 

Next

मुंबई: व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बऱ्याच कालावधीपासून व्हॅकेशन मोडवर काम करत आहे. लवकरच हे फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकेल. सध्या व्हॉट्स अ‍ॅपच्या बिटा व्हर्जनमध्ये व्हॅकेशन मोड उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना अनावश्यक चॅट्स, मेसेज आणि अपेड्टसपासून दिलासा देण्यासाठी व्हॅकेशन मोड फीचर आणलं जाणार आहे. 

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

व्हॅकेशन मोडचा वापर करून तुम्ही पर्सनल किंवा ग्रुप चॅट अर्काईव्ह करू शकता. सध्याच्या अर्काईव्ह मोडमध्ये आणि व्हॅकेशन मोडमध्ये थोडासा फरक आहे. नवीन ऍक्टिव्हिटी झाल्यानंतरही चॅट अर्काईव्ह करण्याची सुविधा व्हॅकेशन मोडमध्ये उपलब्ध आहे. सध्याच्या घडीला तुम्ही कोणतंही चॅट अर्काईव्ह केल्यास व्हॉट्स अ‍ॅप ते चॅट अगदी तळाला पाठवतं. मात्र त्या व्यक्तीकडून किंवा ग्रुपकडून नवा मेसेज आल्यास चॅट लगेच सर्वात वर पॉप अप होतं.

भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

२०१८ मध्ये सर्वप्रथम हे फीचर दिसलं होतं. व्हॉट्स अ‍ॅपच्या नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये शो प्रिव्ह्यू ऑप्शनच्या खाली हा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे फीचर नव्या अवतारात दिसणार आहे. आता व्हॅकेशन मोड स्वतंत्र सेक्शनमध्ये दिसेल. वापरकर्त्यानं व्हॅकेशन मोड सुरू केल्यावर अर्काईव्ह चॅट्स चॅट सेक्शनमध्ये सर्वात वर दिसू लागतील. वेगळ्या चॅटऐवजी सर्व अर्काईव्ह चॅट्स 'अर्काईव्हड चॅट्स' या एकाच सेक्शनमध्ये दिसतील. तुम्ही या टॅबवर क्लिक केल्यावर अर्काईव्हड चॅट्सचा नवा ऑप्शन उजव्या बाजूला सर्वात वर नोटिफिकेशन म्हणून दिसू लागेल. 

WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

वापरकर्त्यानं नोटिफिकेशन्सवर क्लिक केल्यावर तो बिहेव्हियर ऑफ अर्काईव्हड चॅट्सचा पर्याय निवडू शकतो. तिथे वापरकर्त्याला दोन पर्याय दिसतील. 'नोटिफाय न्यू मेसेजेस' किंवा 'ऑटो हाईड इनऍक्टिव्ह चॅट्स' यांच्यातील पर्याय निवडता येऊ शकेल. सध्याच्या घडीला हे दोनच पर्याय उपलब्ध असतील. पुढील काही दिवसांत त्यात आणखी काही पर्यायांची भर पडू शकते.

Read in English

Web Title: whatsapp likely to bring vacation mode that will auto archive personal and group chats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.