जबरदस्त! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, लवकरच भन्नाट फीचर येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:08 IST2024-07-17T14:52:51+5:302024-07-17T15:08:52+5:30
WhatsApp News : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. WhatsApp युजर्सना एक खास फीचर मिळणार आहे.

जबरदस्त! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, लवकरच भन्नाट फीचर येणार
मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. WhatsApp युजर्सना एक खास फीचर मिळणार आहे. WhatsApp साठी फेव्हरेट फीचरची घोषणा करण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना काही नवीन फिल्टर्स मिळतील. झुकंरबर्ग यांनी WhatsApp चॅनलवर याबाबत माहिती दिली आहे.
फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या आवडत्या चॅट्स, ग्रुप चॅट्स आणि कॉल्सचा लगेच वापर करू शकतात. त्यामुळे वेळेचीही बचत होईल. Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, WhatsApp ने आवडते चॅट्स आणि ग्रुप फीचर आणलं आहे.
याच्या मदतीने, युजर्स त्यांच्या सर्वात आवडत्या चॅट्स आणि ग्रुपमध्ये लगेचच प्रवेश करू शकतात. हे फीचर आधी बीटा व्हर्जनमध्ये होतं, पण आता मार्क झुकेरबर्गने हे फीचर रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, जिथे तुम्ही नवीन फिल्टर फीचर पाहू शकता.
आवडते चॅट्स आणि ग्रुप्स येथे पाहता येतील. अशा परिस्थितीत युजर्स ग्रुप आणि इंडिविज्युल चॅट्स मार्क करू शकणार आहेत. अशात सर्चिंग सोपं होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. तुम्ही तुमचे आवडते चॅट्स मार्क करु शकता आणि नंतर फेव्हरेट टॅबमध्ये जाऊन एड करू शकता.