WhatsApp युजर्ससाठी बॅड न्यूज! अनलिमिटेड चॅट बॅकअपची सुविधा होऊ शकते बंद
By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 05:30 PM2021-10-13T17:30:40+5:302021-10-13T17:30:55+5:30
WhatsApp New Feature Update: सध्या WhatsApp चॅट बॅकअप करण्यासाठी Google Drive वर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच हे दृश्य बदलू शकतं.
व्हॉट्सअॅपवर सतत नवनवीन फिचर येत असतात. आता नवीन फीचर येणार आहे, जे युजर्सना चॅटच्या Google Drive बॅकअपवर जास्त नियंत्रण मिळवून देईल. या फीचरच्या मदतीने युजर्स बॅकअपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होईल आणि कोणत्या नाही नाही हे ठरवू शकतील. त्यामुळे बॅकअपचा आकार नियंत्रित करता येईल. परंतु या नवीन फीचरमागील कारण युजर्सना निराश करणारे ठरू शकते.
Google Drive बॅकअपवर येणार मर्यादा
WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार गुगलकडून लवकरच फ्री WhatsApp Chat Backup वर एक मर्यादेची घोषणा केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे Google Photos च्या अनलिमिटेड बॅकअपवर मर्यादा आली आहे त्यानुसार व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपला देखील झळ बसू शकते. रिपोर्टनुसार, ही मर्यादा प्रति युजर 2000MB इतकी असू शकते. यापेक्षा जास्त मोठ्या फाईल्सचा बॅकअप घेण्यासाठी शुल्क देखील आकारले जाऊ शकते.
WhatsApp Chat Backup मधील पर्याय बदलणार
WhatsApp वर लवकरच ‘मॅनेज बॅकअप साइज’ फीचर दिसू शकते. त्यामुळे युजर्स चॅटचा बॅकअप घेताना फोटो , ऑडिओ, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आणि इतर मीडिया फाईल्समधून काय बॅकअपयामध्ये ठेवायचे आणि काय नाही हे ठरवू शकतात. त्यामुळे गुगल ड्राईव्ह की चॅट बॅकअपचा आकार मर्यदित ठेवण्यास मदत होईल. या फिचरची Google किंवा WhatsApp कडून अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.