काही क्षणात होईल WhatsApp अकॉउंटचे व्हेरिफिकेशन; फक्त अँड्रॉइड युजर्सना मिळणार नवीन फिचर 

By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 05:11 PM2021-06-07T17:11:12+5:302021-06-07T17:13:13+5:30

WhatsApp Update: व्हाट्सअ‍ॅप युजर्सचा नंबर व्हेरिफाय करण्यासाठी आता त्यांना कॉल करेल. 

Whatsapp may soon call users for account verification  | काही क्षणात होईल WhatsApp अकॉउंटचे व्हेरिफिकेशन; फक्त अँड्रॉइड युजर्सना मिळणार नवीन फिचर 

व्हाट्सअ‍ॅपवर हे फिचर फक्त अँड्रॉइडसाठीचे सादर केले जाईल.

Next

नवीन स्मार्टफोन विकत घेतल्यावर त्या फोनवर WhatsApp अकॉउंट सेटअप करताना किंवा नवीन अकॉउंट बनवताना व्हाट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करतो. यासाठी व्हाट्सअ‍ॅपद्वारे सहा अंकी कोड तुमच्या नुंबरवर मेसेजच्या माध्यमातून पाठवला जातो. परंतु, आता कंपनी अकॉउंट व्हेरिफाय करण्यासाठी नवीन पद्धत वापरणार आहे. व्हाट्सअ‍ॅप अकॉउंट व्हेरिफाय करण्यासाठी कंपनी युजर्सना फ्लॅश कॉल करू शकते. व्हाट्सअ‍ॅपवर येणाऱ्या नवीन फीचर आणि अपडेट्सवर लक्ष ठेऊन असणाऱ्या ब्लॉग WABetaInfo नुसार, कंपनी या फीचरची चाचणी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर करत आहे. 

अकॉउंट व्हेरिफिकेशनसाठी कंपनी आतापर्यंत रजिस्टर मोबाईल नंबरवर कोड SMS द्वारे पाठवत होती. आता कंपनी युजर्सचा नंबर व्हेरिफाय करण्यासाठी त्यांना कॉल करेल. व्हाट्सअ‍ॅपकडून युजर्सना एक छोटा कॉल केला जाईल. हा कॉल युजर्सनी उचलण्याची आवश्यकता नाही.  

व्हाट्सअ‍ॅपवर हे फिचर फक्त अँड्रॉइडसाठीचे सादर केले जाईल. iOS वर अ‍ॅप्सना युजर्सची कॉल हिस्ट्री जाणून घेण्याची परवानगी नसते. WABetaInfo नुसार, नवीन पद्धतीमध्ये अ‍ॅप व्हेरिफिकेशनसाठी कॉल लॉग रीड करेल. या रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे कि, व्हाट्सअ‍ॅप युजर्सच्या या डेटाचा वापर कंपनी इतर कुठेही करणार नाही.  

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि, व्हाट्सअ‍ॅप एकच अकॉउंट अनेक डिवाइसमध्ये वापरता यावे म्हणून मल्टी डिवाइस फीचरवर काम करत आहे. कंपनीने सांगितले आहे कि ते एक अकॉउंट वेगवेगळ्या डिवाइसवर अ‍ॅक्सेस करण्याच्या फिचरवर काम करत आहेत. या फिचरच्या माध्यमातून एक व्हाट्सअ‍ॅप अकॉउंट चार डिवाइसवर वापरता येईल. 

Web Title: Whatsapp may soon call users for account verification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.