WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट  

By सिद्धेश जाधव | Published: September 18, 2021 06:48 PM2021-09-18T18:48:02+5:302021-09-18T18:49:01+5:30

WhatsApp multi-device feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या 2.21.19.9 अपडेटमधून नवीन मल्टी डिवाइस फिचर अँड्रॉइड आणि आयओएससाठी उपलब्ध होणार आहे.  

Whatsapp multi device support now made available to non beta users heres how to enable feature  | WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट  

WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट  

Next

WhatsApp लवकरच एका अपडेटच्या माध्यमातून नॉन बीटा युजर्ससाठी मल्टी-डिवाइस फिचर सादर करणार आहे. या अपडेटच्या माध्यमातून नॉन बीटा युजर्स देखील मल्टी-डिवाइसच्या बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊ शकतात, अशी माहिती WABetainfo ने दिली आहे. नवीन फिचरचा वापर करून युजर्स मूळ डिवाइस व्यतिरिक्त एका अकॉउंटशी चार डिवाइस कनेक्ट करू शकतात. परंतु कनेक्ट केलेले इतर डिवाइस फोन असू शकत नाहीत.  

लोकप्रिय मेसेंजरच्या 2.21.19.9 अपडेटमधून सर्व युजर्सना मल्टी-डिवाइस फिचर वापरण्याची संधी मिळेल. हा अपडेट अँड्रॉइड तसेच आयओएसवर देखील उपलब्ध होईल. भविष्यात अजून अपडेट मिळवायचे असतील तर युजर्सना मल्टी-डिवाइस व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावा लागेल.  

या फिचरची घोषणा कंपनीने जूनमध्ये केली होती. या फिचरच्या मदतीने फोन सोडून पीसी, मॅक आणि टॅबलेट आपल्या मुख्य व्हॉट्सअ‍ॅप अकॉउंटशी कनेक्ट करू शकतील. असे केल्यांनतर मूळ डिवाइसमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले किंवा फोन बंद असला तरी कनेक्टड डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल.  

व्हॉट्सअ‍ॅपवर Multi-device फिचर वापरण्यासाठी  

1. WhatsApp ओपन करा. 
2. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात तीन डॉट्सवर क्लिक करा.  
3. Linked Devices वर टॅप करा. 
4. त्यानंतर Multi-Device Beta वर क्लीक करा. 
5. इथे Join Beta वर क्लीक केल्यावर तुम्ही दुसरा डिवाइस कनेक्ट करण्यास सज्ज व्हाल.  

Web Title: Whatsapp multi device support now made available to non beta users heres how to enable feature 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.