तुमच्या WhatsApp वर भरपूर Group झालेत का? आता टेन्शन विसरा, येतंय नवं फिचर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:40 PM2022-08-08T20:40:19+5:302022-08-08T20:42:09+5:30
WhatsApp नवं फिचर आणतंय ज्यात युजर्सना एक खास सुविधा मिळणार आहे.
WhatsApp New Feature चॅटिंग अॅप्सचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे WhatsApp. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन अपडेट्स आणत असते. व्हॉट्सअॅपचे अनेक नवनवीन अपडेट्स वापरकर्त्यांना आनंद देऊन जातात. सध्या मिळत असलेल्या बातम्यांनुसार, व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन अपडेटवर काम करत आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअॅपवर तुमचा फोन नंबर लपवू शकणार आहात. तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले तरीही तुम्ही दुसऱ्यांना दिसू शकणार नाही अशाप्रकारचं हे सेटिंग असणार आहे असं बोललं जात आहे.
व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे नवं फिचर यूजर्सच्या प्रायव्हसीशी संबंधित असणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतरही तुमचा फोन नंबर तुम्हाला लपवता येणार आहे. हे फिचर अद्याप टेस्टर्स साठीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, कारण या फिचरवरील काम पूर्ण झालेले नाही.
WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना असा पर्याय देणार आहे की कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्यानंतर ते त्या ग्रुपच्या लोकांपासून त्यांचा फोन नंबर लपवू शकतील. जेव्हा तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड केले जाईल, तेव्हा तुमचा नंबर लपविला जाईल आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रुपमधील काही सदस्यांसह तुमचा नंबर सेव्ह करू शकाल. सध्या हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा 2.222.17.23 वर डेव्हलपमेंट दरम्यान दिसले आहे. असे म्हटले जात आहे की हे अपडेट फक्त Google Play Beta प्रोग्रामद्वारे Android Beta 2.22.17.23 साठी जारी केले जाईल. सध्या ते Apple फोनसाठी आणले जाणार नाही.