लय भारी! WhatsApp वर फोटो शेअर करताना आता होणार नाही ब्लर; आलं 'हे' दमदार नवं फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 02:20 PM2023-08-19T14:20:11+5:302023-08-19T14:28:03+5:30

WhatsApp वर गेल्या काही महिन्यांपासून अनेक फीचर्स रोलआउट करण्यात आली आहेत. जी युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी काम करू शकतात.

whatsapp new feature users can now share photos and videos in hd | लय भारी! WhatsApp वर फोटो शेअर करताना आता होणार नाही ब्लर; आलं 'हे' दमदार नवं फीचर

लय भारी! WhatsApp वर फोटो शेअर करताना आता होणार नाही ब्लर; आलं 'हे' दमदार नवं फीचर

googlenewsNext

WhatsApp वर गेल्या काही महिन्यांपासून अनेक फीचर्स रोलआउट करण्यात आली आहेत. जी युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी काम करू शकतात. आता आणखी एक नवीन दमदार फीचर आलं आहे, जे युजर्सना HD क्लालिटीमध्ये फोटो पाठवण्याची परवानगी देईल. WhatsApp ने या आठवड्याच्या सुरुवातीलाच याची घोषणा केली होती. नवीन अपडेटसह, युजर्स HD किंवा स्टँडर्ड क्लालिटीसह फोटो पाठवू शकतील. परंतु फोटो लोड होण्यास थोडा वेळ लागू शकतो. जर फोटो HD मध्ये पाठवला तर तो जास्त स्टोरेज घेईल. युजर्स या फीचरची मागणी करत होते.

मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले, 'WhatsApp वर फोटो शेअरिंगला नुकतंच एक अपग्रेड मिळाले आहे. तुम्ही आता HD मध्ये फोटो शेअर करू शकता. पोस्टमध्ये, त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये एचडी किंवा स्टँडर्ड क्लालिटीमध्ये फोटो कसे पाठवायचे ते सांगितलं आहे. फोटो सेंट करण्याची प्रक्रिया सारखीच आहे, फक्त त्याच्या पुढे तुम्हाला HD चा पर्याय मिळेल.

WhatsApp ने म्हटलं आहे की स्टँडर्ड क्वालिटी डीफॉल्ट असेल. म्हणजेच तुम्ही फोटो निवडून पाठवलात तर फोटो स्टँडर्ड साईडमध्ये जाईल. HD मध्ये पाठवण्यासाठी तुम्हाला पर्यायावर क्लिक करावे लागेल. एपचे म्हणणे आहे की हे फीचर काही आठवड्यांत सर्वांसाठी आणलं जाईल. लवकरच HD व्हिडिओचा पर्यायही एपवर उपलब्ध होणार आहे.

WhatsApp वर पाठवलेले फोटो एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतात. मल्टी-डिव्हाइस एड कॅपेसिटीनंतर सुविधा सुरू झाली, जेणेकरून युजर्स एकाच वेळी एका फोनवर आणि इतर चार डिव्हाइसवर WhatsApp वापरू शकतात. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: whatsapp new feature users can now share photos and videos in hd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.