WhatsApp वर मोठा धोका! युजर्सनी 'या' नंबवरवर चुकूनही कॉल केला तर होऊ शकते अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:09 PM2022-05-26T13:09:02+5:302022-05-26T13:09:56+5:30

WhatsApp : ज्या युजर्सची फसवणूक करायची आहे, त्या युजर्सला हॅकरचा कॉल येतो. त्यानंतर युजर्सला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितले जाते.

whatsapp new hacking in trend do not call on this number to get account safe know how to be secure | WhatsApp वर मोठा धोका! युजर्सनी 'या' नंबवरवर चुकूनही कॉल केला तर होऊ शकते अकाऊंट हॅक

WhatsApp वर मोठा धोका! युजर्सनी 'या' नंबवरवर चुकूनही कॉल केला तर होऊ शकते अकाऊंट हॅक

googlenewsNext

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) हॅकिंगचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. युजर्सची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नव-नवीन पद्धतींचा अवलंब करतात, यामध्ये हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप सिक्युरिटी कोड ब्रेक करून अकाऊंटमध्ये अ‍ॅक्सेस करत आहेत. CloudSEk चे सीईओ आणि संस्थापक राहुल सासी (Rahul Sasi) यांनी म्हटले आहे की, हॅकर्सनी आता नवी पद्धत अवलंबली असून ते युजर्सचे अकाऊंट अ‍ॅक्सेस करत आहेत. ही नवीन ट्रिकची पद्धत खूप सोपी आहे, ज्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक केले जाऊ शकते, असेही राहुल सासी यांनी सांगितले. 

ज्या युजर्सची फसवणूक करायची आहे, त्या युजर्सला हॅकरचा कॉल येतो. त्यानंतर युजर्सला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितले जाते. जर युजर्सने नंबर डायल केला, तर हॅकर्स आरामात युजर्सच्या अकाउंटवर आरामात ताबा मिळवू शकतो. या नवीन फसवणुकीबाबत राहुल सासी म्हणाले की, ही खूप सोपी आणि छोटीशी प्रक्रिया आहे. 

हॅकिंगसाठी हॅकर्स युजर्सला कॉल करतात. त्यानंतर युजर्सला '**67*<10 डिजिट नंबर > या *405*<10 डिजिट नंबर >’ डायल करण्यासाठी तयार करतात. अशा परिस्थितीत जर चुकूनही युजर्सनी यावर कॉल केले तर ते मोठ्या अडचणीत सापडू शकतील आणि त्यांच्या अकाऊंटचे अ‍ॅक्सेस हॅकर्सजवळ जाईल. अ‍ॅक्सेस मिळवल्यानंतर हॅकर्स युजर्सला संबंधित कॉन्टॅक्टद्वारे पैशांची मागणी करतात. दरम्यान, असे झाल्यानंतर युजर्सला समजते की, त्यांचे अकाऊंट हॅक झाले आहे. 

युजर्स कसे सुरक्षित राहतील?
जर कोणतीही व्यक्ती कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नावाखाली तुम्हाला 67 किंवा 405 ने सुरू होणार्‍या नंबरवर कॉल करण्यास सांगत असेल तर ते कधीही करू नका. याशिवाय, अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर 2-स्टेप व्हेरिफिकेशन करावा आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड किंवा पिन सेट करावा, असा सल्ला राहुल सासी यांनी दिला आहे.

Web Title: whatsapp new hacking in trend do not call on this number to get account safe know how to be secure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.