अरे व्वा! WhatsApp वर आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार; जबरदस्त फीचर गंमत वाढवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 04:37 PM2021-09-18T16:37:44+5:302021-09-18T16:42:24+5:30

Whatsapp new send image as sticker feature : फोटो सेंड करण्याची पद्धत बदलणार आहे. युजर्सना आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार असून चॅटिंगची गंमत आणखी वाढवणार आहे.

whatsapp new send image as sticker feature allows users to convert their images into stickers | अरे व्वा! WhatsApp वर आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार; जबरदस्त फीचर गंमत वाढवणार 

अरे व्वा! WhatsApp वर आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार; जबरदस्त फीचर गंमत वाढवणार 

googlenewsNext

नवी दिल्ली - WhatsApp आपल्या युजर्संचं चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनी आणखी एक नवीन दमदार फीचर आणण्याच्या तयारीत आहे. फोटो सेंड करण्याची पद्धत बदलणार आहे. युजर्सना आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार असून चॅटिंगची गंमत आणखी वाढवणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करण्याच्या फीचरवर व्हॉट्सअ‍ॅप काम करत आहे. नवीन फीचर आता डेव्हलपिंग मोडवर आहे. कंपनी लवकरच याला व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप युजर्ससाठी रोलआऊट करू शकते. 

नवीन फीचर रोलआऊट केल्यानंतर युजर्संना अ‍ॅपमध्ये नवीन फोटो अपलोड केल्यानंतर कॅप्शन बारच्या बाजुला नवीन स्टिकर आयकॉन दिसेल. या आयकॉनला सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप इमेजला फोटो ऐवजी स्टिकर म्हणून सेंड करू शकाल. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, युजर हे व्हेरिफाइड करू शकेल की सेंड करण्यात आलेला फोटो आहे की स्टिकर आहे. फीचर युजर्संना तात्काळ इमेजला स्टिकर मध्ये बदलण्यासाठी मदत करेन. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टीची गरज लागणार नाही.

रिपोर्टमध्ये हे कन्फर्म करण्यात आले की, कंपनीकडून अँड्रॉयड आणि iOS बीटा व्हर्जनसाठी या फीचरवर काम केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिव्हाईस फीचरमध्ये अ‍ॅक्सेस देण्याची योजना आखत आहे. काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मल्टी-डिव्हाईस सपोर्टसंदर्भात पॉप-अप मिळाले आहेत. एकदा रोलआउट झाल्यावर, मल्टी-डिव्हाइस फीचर युजर्सना त्यांच्या फोनसोबत आणखी चार डिव्हाईसवर अ‍ॅक्सेस दिला जाईल. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून ते सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp वरच चेक करा 'बँक बॅलेन्स'; 'या' स्टेप्समुळे सहज होईल शक्य 

व्हॉट्सअ‍ॅपने आता UPI पेमेंट सर्व्हिसची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. UPI पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे संपूर्ण देशात पैसे पाठवता येतात. तसेच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येतो. व्हॉट्सअ‍ॅपने हे पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत पार्टनरशिपमध्ये डिझाईन केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी सर्वात आधी युजर्सकडे देशामध्ये बँक अकाऊंट अथवा डेबिट कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही WhatsApp Account मध्ये UPI Payment अद्यापही सेट केलं नसेल, तर हा पेमेंट ऑप्शन सेट करू सकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय निवडता येईल.सर्वात आधी उजव्या बाजूला वर असलेल्या तीन लाइनवर क्लिक करावं लागेल.त्यानंतर ज्या बँक अकाउंटला तुमचा WhatsApp नंबर जोडलेला आहे, तोच फोन नंबर युजर या WhatsApp Payment मध्ये जोडू शकतात. म्हणजे ज्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आहे, त्या नंबरवरच तुमचा बँक अकाउंट नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. शेवटी UPI PIN सेट करावा लागेल. या PIN द्वारेच ट्रान्झेक्शन करता येईल. 

Read in English

Web Title: whatsapp new send image as sticker feature allows users to convert their images into stickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.