WhatsApp अपडेट! आता एकाहून अधिक लोकांना फॉरवर्ड करता येणार नाही मेसेज; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:44 PM2022-03-16T16:44:07+5:302022-03-16T16:50:12+5:30

Whatsapp New Update : WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिटेशन सेट करण्यात आलं आहे.

whatsapp new update sets the limit of forwading message to more than one group and chat know what change | WhatsApp अपडेट! आता एकाहून अधिक लोकांना फॉरवर्ड करता येणार नाही मेसेज; 'हे' आहे कारण

WhatsApp अपडेट! आता एकाहून अधिक लोकांना फॉरवर्ड करता येणार नाही मेसेज; 'हे' आहे कारण

Next

नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी WhatsApp सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp चा वापर हा प्रामुख्याने फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या फाईल्स पाठवण्यासोबतच ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी केला जातो. एखादा मेसेज हा अनेकांना पाठवण्याची सोय आहे. म्हणजेच तो मेसेज पाच जणांना फॉरवर्ड करू शकतो. पण आता नवीन अपडेटनुसार एकाहून अधिक लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. 

WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिटेशन सेट करण्यात आलं आहे.  WABetaInfo ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिट आणत असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने WhatsApp च्या माध्यमातून चुकीची माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. WhatsApp च्या फॉरवर्डिंग मेसेज फीचरच्या माध्यमातून युजर एका ग्रुपमधून मेसेज हा दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवू शकतात. 

पाठवण्यात आलेल्या मेसेजवर फॉरवर्डेड असं लेबल असतं. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला हा फॉरवर्ड केलेला मेसेज आहे हे पटकन समजतं. एखादा मेसेज पाच पेक्षा जास्त वेळा पाठवला गेला असेल तर त्याच्यावर ‘Forwaded many times’ असं लिहिलं जातं. पण आता हे रिस्ट्रिक्टेड केलं आहे. नव्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काळात ही लिमिट आणखी कमी केली जाऊ शकते. WhatsApp लवकरच मेसेज एकाहून अधिक ग्रुपमध्ये फॉर्वर्ड करण्यावर बंदी आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

WABetainfo ने एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आता सर्व मेसेज फॉरवर्ड करण्याची लिमिट कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. मेसेजिंग App WhatsApp वर चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये म्हणून युजरला त्यांचा फॉरवर्ड मेसेज रिव्ह्यू करण्यासाठी आणि चुकीच्या बातमीचा किंवा मेसेजचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हे नवं अपडेट फायद्याचं ठरणार आहे. WhatsApp चॅट लिस्ट सेक्शनसाठी end-to-end इंडिकेटर्सवर देखील काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Read in English

Web Title: whatsapp new update sets the limit of forwading message to more than one group and chat know what change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.