Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:16 AM2020-01-07T09:16:40+5:302020-01-07T09:36:24+5:30
स्मार्टफोन युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कारण नविन वर्षाच्या निमित्ताने युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजनी धुमाकूळ घातला होता. सरत्या वर्षाला आनंदात निरोप देत मोठ्या दणक्यात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र स्मार्टफोन युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कारण नविन वर्षाच्या निमित्ताने युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Whatsapp वर 'New Year Virus' असा एक नवा व्हायरस अॅक्टिव्ह झाला असून अनेक स्मार्टफोनला त्याने लक्ष्य केले आहे. युजर्सना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये एखाद्या वेबपेजची लिंक दिली जाते. हॅकर्स या लिंकवर क्लिक करण्यासाठी युजर्सना काही आकर्षक ऑफर्स देत असतात. मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करताच स्मार्टफोन किंवा संगणक हॅक होण्याची शक्यताही अधिक असते. याशिवाय हे व्हायरसचे मेसेज अनेक जाहिरातींद्वारेही पाठवले जातात. तसेच यामध्ये काही खोट्या सेवांना सबस्क्राइब करण्यास सांगितले जाते.
Whatsapp वर आलेला 'New Year Virus' हा एक नवा व्हायरस एक धोकादायक व्हायरस असून युजर्सना नुकसान पोहचवू शकतो. अशा मेसेजवर क्लिक न करणं हा या व्हायरसपासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे. तसेच मेसेज करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करावं. सातत्याने हॅकर्स फेक मेसेज हे पाठवून युजर्सना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अशा मेसेजपासून सावध राहा. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.
नववर्षात व्हॉट्सअॅपने रेकॉर्ड केला आहे. फक्त 24 तासांत 100 अब्ज मेसेज करण्यात आले आहेत. वाढदिवस, सण आणि इतर अनेक कारणांसाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने असाच उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सअॅपवर मेसेजचा महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे तब्बल 100 अब्ज मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील 20 अब्ज मेसेज हे फक्त भारतीयांनी पाठवले आहेत.
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
व्हॉट्स अॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...
Whatsapp वर नववर्षाचं दमदार स्वागत, 24 तासांत 100 अब्ज मेसेज
चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी
काय सांगता? इंटरनेटशिवाय आता शेअर करता येणार फोटो, व्हिडीओ