WhatsApp काम करत नाही, घेऊ नका ताण, तुम्ही मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप वापरू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:12 PM2022-10-25T14:12:02+5:302022-10-25T14:14:32+5:30

गेल्या अर्ध्या तासापासून करोडो मेसेजची आदान प्रदान करणारे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले आहे. साडे बारा वाजल्यापासून Whats App बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत.

WhatsApp not working you can use this app for messaging telegram snapchat | WhatsApp काम करत नाही, घेऊ नका ताण, तुम्ही मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप वापरू शकता

WhatsApp काम करत नाही, घेऊ नका ताण, तुम्ही मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप वापरू शकता

Next

गेल्या अर्ध्या तासापासून करोडो मेसेजची आदान प्रदान करणारे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले आहे. साडे बारा वाजल्यापासून Whats App बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपची सेवा यापूर्वीही अनेकदा डाऊन झाली होती. पण लगेच पुन्हा पुर्ववत सुरू झाले होते,  मात्र आज गेल्या पाऊनतासापासून डाऊन झाले आहे, त्यामुळे अनेकांनी तक्रारी सुरू केल्या आहेत. आता अनेकजण whwtsapp ला पर्याय शोधत आहे. 

भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेसह जगातील अनेक भागांमध्ये अॅपची सेवा बंद आहे. whwtsappची मेसेजिंग सेवा जवळपास ३० मिनिटांपासून ठप्प आहे. कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ट्विटरवरील इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, वापरकर्ते whwtsappची सेवा ठप्प झाल्याची तक्रार करत आहेत.

आता आपण इतर कोणतेही पर्यायी अॅप्स देखील वापरू शकता. इन्स्टंट मेसेज प्लॅटफॉर्मची सेवा केवळ WhatsApp वरच नाही तर इतर अनेक अॅप्सवरही उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून तुम्ही हे अॅप वापरू शकता. 

Telegram  

WhatsApp ला पर्याय म्हणून टेलीग्राम या अॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर WhatsApp चे आणखी फीचर्स मिळतात. यावर तुम्हाला चॅनेल आणि इतर फीचर्स मिळतात. अधिक फीचर्स असूनही हे अॅप व्हॉट्सअॅपइतके लोक वापरत नाहीत. हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे.

Signal

WhatsApp ला पर्याय म्हणून Signal या अॅपचाही वापर केला जातो. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत, हे अॅप आधीपासूनच व्हॉट्सअॅपवरून अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते. तुम्हाला व्हॉट्सअॅपचा पर्याय हवा असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आपण ते विनामूल्य डाउनलोड करू शकता.

Discord

Discord  हा प्लॅटफॉर्म इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून सुरू झाला नाही. त्याऐवजी ते ग्रुपमध्ये मेसेजसाठी बनवले होते, पण आता तुम्ही व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून वापरू शकता. त्याचे डीएम फीचर अनेकांना खूप आवडते. तुम्ही हे अॅप सर्व Android, iOS, Windows, Linux, MacOS वर वापरू शकता.

WhatsApp Down: साडेबारा वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपचे वाजले बारा; मेसेज जाईनात की येईनात

Snapchat

या अॅपवर तुम्हाला व्हॉट्सअॅपसारखे वाटणार नाही तर हे इन्स्टाग्रामसारखे वाटणार आहे, पण  तुम्ही इन्स्टंट मेसेजिंगसाठी याचा वापर करू शकता. तुम्ही हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत डाउनलोड करू शकता.

Web Title: WhatsApp not working you can use this app for messaging telegram snapchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.