कमाल! iPhone मधलं फीचर आता WhatsApp वरही मिळणार; अँड्रॉईड युजर्सना मजा येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:37 PM2023-12-13T12:37:17+5:302023-12-13T12:51:37+5:30

WhatsApp युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

whatsapp now lets you pin message in groups and chats here is how to do that | कमाल! iPhone मधलं फीचर आता WhatsApp वरही मिळणार; अँड्रॉईड युजर्सना मजा येणार

कमाल! iPhone मधलं फीचर आता WhatsApp वरही मिळणार; अँड्रॉईड युजर्सना मजा येणार

WhatsApp ने एक नवीन फीचर रोलआऊट केलं आहे जे Android आणि iOS युजर्सना चॅट आणि ग्रुपमध्ये मेसेज पिन करण्याची सुविधा देतं. जेव्हा तुम्ही मेसेज पिन करता तेव्हा तो चॅट विंडोच्या टॉपवर दिसेल. सध्या कंपनी एकावेळी एकच मेसेज पिन करण्याची सुविधा देत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला त्याने दिलेल्या लोकेशनवर भेटायला जात असाल किंवा तुम्ही चर्चेसाठी कोणताही महत्त्वाचा मेसेज मार्क केला असेल तर तुम्हाला या फीचरचा जास्त फायदा होईल. 

WhatsApp युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. त्याचप्रमाणे आता देखील पिन फीचरच्या मदतीने तुम्हाला चॅटमधील उपयुक्त माहिती लगेच मिळेल आणि तुम्हाला मेसेज शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कंपनी आगामी काळात अनेक मेसेज पिन करण्याची सुविधा देणार आहे. सध्या हे फीचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससोबत उपलब्ध आहे.

Android मध्ये कोणताही मेसेज पिन करण्यासाठी, तुम्हाला त्या मेसेजवर दीर्घकाळ प्रेस करावं लागेल. यानंतर तुम्हाला पिन मेसेजचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करताच तुमचा मेसेज वरच्या बाजूला पिन होईल. तुम्‍ही केवळ मेसेज पिन करू शकणार नाही तर इमेज देखील पिन करू शकता. iOS मध्ये मेसेज पिन करण्यासाठी, तुम्हाला तो उजवीकडे स्वाइप करावा लागेल.

सेट करू शकता वेळ 

पिन मेसेज किती काळ ठेवायचा हे देखील तुम्ही ठरवू शकता. कंपनी तुम्हाला 24 तास, 7 दिवस आणि 30 दिवसांचा पर्याय देते. तुम्ही कोणताही एक पर्याय निवडू शकता. एप डिफॉल्टनुसार 7 दिवसांचा पर्याय निवडतो. जर तुम्हाला मेसेज अनपिन करायचा असेल तर तुम्हाला हीच प्रक्रिया फॉलो करावी लागेल. यावेळी तुम्हाला Pin ऐवजी Unpin चा पर्याय मिळेल.

लक्षात ठेवा, ग्रुप एडमिनिस्ट्रेटरने तुम्हाला तसं करण्याची परवानगी दिली तरच तुम्हाला ग्रुपमधील कोणताही मेसेज पिन करण्याची परवानगी दिली जाईल. परवानगीशिवाय तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पिन करू शकणार नाही. सध्या, कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर जारी करत आहे जे तुम्हाला हळूहळू मिळेल.
 

Web Title: whatsapp now lets you pin message in groups and chats here is how to do that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.