WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 08:15 PM2024-05-28T20:15:58+5:302024-05-28T20:16:25+5:30
WhatsApp : व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे.
नवी दिल्ली : व्हॉट्सॲप (WhatsApp) युजर्स आता मोठे व्हॉईस मेसेज पाठवू शकणार आहेत. मेटा कंपनीने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी हे नवीन फीचर्स जारी केले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. युजर्स आता आपल्या स्टेटसमध्ये 1 मिनिटाचे व्हॉईस मेसेज ॲड शकतील.
याशिवाय, व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे. व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे युजर्सचे बरेच टेन्शन संपले आहे. आता युजर्स एकाच वेळी स्टेटसमध्ये मोठे व्हॉईस मेसेज टाकू शकतात. यापूर्वी युजर्सना व्हॉईस मेसेज स्टेटसमध्ये फक्त 30 सेकंद ठेवता येत होते. त्यामुळे त्यांना दोन भागात व्हॉईस मेसेज पाठवावे लागत होते.
दरम्यान, हे फीचर्स टप्प्याटप्प्याने जारी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉईस मेसेज शेअर करण्याचा पर्याय मिळत नसेल, तर तुमचे ॲप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा. व्हॉट्सॲपने हे फीचरला स्डँडर्ड तसेच बिझिनेस अकाउंट युजर्ससाठी जारी केले आहे.
असा करा वापर....
- सर्वात आधी तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप अपडेट करा.
- यानंतर ॲप ओपन करा.
- त्यानंतर खालील Updates टॅबवर जा.
- आता तुम्हाला येथे Plus आयकॉन किंवा Pencil आयकॉनवर टॅप करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तळाशी उजव्या बाजूला एक Pencil आयकॉन दिसेल.
- त्यावर टॅप करताच तुम्हाला व्हॉईस रेकॉर्ड करून शेअर करण्याचा पर्याय मिळेल.
- अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉइस मेसेज शेअर करू शकाल.
दरम्यान, जर हे फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अजून उपलब्ध नसेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला हे फीचर मिळण्यास सुरुवात होईल. यानंतर, तुम्ही वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉईस मेसेज शेअर करू शकाल.