WhatsApp ची मोठी घोषणा! आणलं आजवरचं सर्वात जबरदस्त फीचर, होणार महत्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:01 PM2022-11-03T17:01:36+5:302022-11-03T17:02:46+5:30

'मेटा' कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आज WhatsApp वर Communities फीचर लॉन्च केलं आहे.

WhatsApp officially launches its new discussion group feature Communities | WhatsApp ची मोठी घोषणा! आणलं आजवरचं सर्वात जबरदस्त फीचर, होणार महत्वाचे बदल

WhatsApp ची मोठी घोषणा! आणलं आजवरचं सर्वात जबरदस्त फीचर, होणार महत्वाचे बदल

Next

नवी दिल्ली-

'मेटा' कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आज WhatsApp वर Communities फीचर लॉन्च केलं आहे. हे नवं फीचर आजपासूनच ग्लोबल पातळीवर जारी करण्यात आलं असलं तरी ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. WhatsApp च्या कम्युनिटी फीचरबाबत कंपनीनं या वर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती. कंपनीकडून विविध झोनमध्ये याची चाचणी देखील सुरू होती. 

व्हॉट्सअ‍ॅपच्या कम्युनिटी फीचरच्या माध्यमातून युझर्स ग्रूपमध्ये एकाचवेळी कनेक्ट होऊ शकणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर युझर्स आता ग्रूपच्या अंतर्गत निवडक लोकांचा आणखी एक सब-ग्रूप तयार करून त्यांना मेसेज करता येणार आहे. WhatsApp Communities फीचरच्या माध्यमातून कंपनीनं शाळा, महाविद्यालयं आणि वर्कप्लेसवर लक्ष्य केंद्रीत करू इच्छित आहे. युझर्सना यात एका मोठ्या ग्रूपमध्येही मल्टीपल ग्रूप कनेक्ट करता येणार आहेत. कंपनीनं सध्या ५० हून अधिक संस्थांसोबत यावर १५ देशांमध्ये काम सुरू केलं आहे. 

कसं वापरायचं Community?
यूझरला या फीचरचा वापर करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइलमध्ये चॅटच्या टॉपवर तर ios यूझरला खालच्या बाजूला Communities नावाच्या टॅबवर क्लिक करावं लागेल. इथून युझर Community ला नवा ग्रूप किंवा आधीपासूनच असलेल्या ग्रूपमध्ये सब-ग्रूप तयार करता येणार आहे. 

Community मध्ये युझर अगदी सहजरित्या ग्रूपमध्येही स्विच करू शकेल. अ‍ॅडमिन महत्वाची माहिती Community च्या सर्व सदस्यांना पाठवू शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार यामुळे युझर्सना उच्चप्रतिची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी मिळू शकते. या फीचरमुळे युझरला आता वेगवेगळे ग्रूप्स तयार करण्याची गरज नाही आणि एकच मेसेज वेगवेगळ्या ग्रूपवर सेंड करण्याचीही गरज भासणार नाही. युझरला आवश्यक सदस्यांची कम्युनिटी तयार केली की तुम्हाला हवा असलेला ठराविक मेसेज तुम्ही इच्छित असलेल्या ठराविक युझरला पाठवता येणार आहे. 

दरम्यान, या फीचरच्या माध्यमातून कंपनी आपल्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पॉलिसी देखील सुरूच ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे युझर्सच्या माहितीची अ‍ॅक्सेस अगदी कंपनीकडे देखील असणार नाही. त्यामुळे युझरसी सुरक्षा अबाधित राहणार आहे. कम्युनिटीसोबतच कंपनीनं तीन आणखी नवे फिचर्स आज लॉन्च केले आहेत. 

WhatsApp यूझर्स आता एकाचवेळी ३२ सदस्यांसोबत व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. याशिवाय ग्रूप साइजमध्ये वाढ करुन आता ५१२ वरुन सदस्य संख्या १०२४ इतकी करण्यात आली आहे. WhatsApp ग्रूपमध्ये इन-चॅट पोल देखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रूपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपलं मत नोंदवू शकणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: WhatsApp officially launches its new discussion group feature Communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.