WhatsApp आणतंय खास ऑफर! Payment केल्यानंतर मिळणार जबरदस्त Cashback; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:29 AM2022-04-28T11:29:06+5:302022-04-28T11:30:23+5:30
या क्षेत्रात वॉट्सअॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.
युजर्सना आपल्या पेमेंट प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) जबरदस्त कॅशबॅक योजना तयार करत आहे. याशिवाय, सोशल मीडिया दिग्गज मर्चंट पेमेंट्स साठीही याचे परीक्षण केले जात आहे. या क्षेत्रात वॉट्सअॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअॅप युजर्ससाठी पेमेंट सेवेची मर्यादा 100 दशलक्षपर्यंत वाढवली होती. हा एक पॉझिटिव्ह संकेत आहे, कारण भारतात यापूर्वीपासूनच 400 मिलियन+ युजर आहेत. जे रोज आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि इतरांनाही पेमेंट करण्यासाठी अॅपचा वापर करतात.
WhatsApp भारतातील युजर्सना देणार एवढे पैसे -
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मवरून ट्रांझेक्शन करणाऱ्या युजर्सना 33 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यास तयार आहे. व्हॉट्सअॅप पेचा वापर करून युजर्स चॅट विंडोच्या माध्यमाने थेट आपल्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवू शकतात.
1 रुपया सेंड केला तरीही मिळणार कॅशबॅक -
व्हॉट्सअॅप कॅशबॅक मिळविण्यासाठी युजर्सना नेमके किती पैसे पाठवावे लागती, याला कसल्याही प्रकारची किमान मर्यादा नाही. कॅशबॅक तीन ट्रांझेक्शनमध्ये विभागलेले असेल. मग, युजरने व्हॉट्सअॅप पेवरून इतर युजर्सना 1 रुपयापेक्षाही कमी पैसे पाठवले, तरीही ते ट्रांझेक्शनसाठी पात्र असेल.
कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हे कॅशबॅक अभियान ते एका विशिष्ट पद्धतीने चालवत आहे. जेनेकरून, व्हॉट्सअॅप पेमेंटची शक्यता अनलॉक करता येऊ शकेल. खरे तर Whatsapp कडून युजर्सना कॅशबॅक ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.