Whatsapp ने आणलं प्रायव्हसी चेकअप फीचर; जाणून घ्या, कसं सुरक्षित ठेवायचं अकाऊंट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:37 PM2024-01-04T16:37:25+5:302024-01-04T16:37:45+5:30

Meta ने अलीकडेच एक प्रायव्हसी चेकअप फीचर सादर केलं आहे, जे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया...

Whatsapp privacy checkup feature know your account is protected and secure | Whatsapp ने आणलं प्रायव्हसी चेकअप फीचर; जाणून घ्या, कसं सुरक्षित ठेवायचं अकाऊंट?

Whatsapp ने आणलं प्रायव्हसी चेकअप फीचर; जाणून घ्या, कसं सुरक्षित ठेवायचं अकाऊंट?

जगभरातील लाखो लोक Whatsapp हे मेसेजिंग App वापरतात. लोक त्याचा वापर चॅट करण्यासाठी, फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी करतात. मेटा आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp ची सुरक्षा आणि प्रायव्हसी वाढवण्यावर सतत भर देत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, कंपनीने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत, परंतु बऱ्याच युजर्सना त्याच्याबद्दल माहीत नाही. 

Meta ने अलीकडेच एक प्रायव्हसी चेकअप फीचर सादर केलं आहे, जे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया... हे फीचर युजर्सना WhatsApp सेटिंग्जमधील सर्व प्रायव्हसी सेटिंग्ज सहजपणे रिव्यू आणि मॅनेज करण्याची परवानगी देते. त्याच्या मदतीने, युजर्स त्यांची माहिती कोण पाहू शकतात हे नियंत्रित करू शकतात.

हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये "स्टार्ट प्रायव्हसी चेकअप" वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला अनेक स्क्रीनवर नेले जाईल जिथे तुम्ही निवडू शकता की तुमच्याशी कोण संपर्क साधू शकतं, तुम्हाला ग्रूपमध्ये जोडू शकतो आणि तुमचे ब्लॉक केलेले संपर्क मॅनेज करू शकतो. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती एडीट करू शकता, जसे की तुमचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस आणि रिड रिसिप्ट्स. याव्यतिरिक्त, डिसएपियरिंग मेसेज सेटअप करून आणि एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप इनेबल करून तुम्ही तुमच्या चॅट आणि ग्रुपमध्ये अधिक प्रायव्हसी जोडू शकता. 

अनोळखी कॉलर्सना गप्प करा

1. यासाठी आधी Whatsapp ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.
2. अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रायव्हसीवर टॅप करा.
3. खाली स्क्रोल करा आणि ब्लॉक केलेला संपर्क निवडा.
4. यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात Add वर क्लिक करा.
5. यानंतर अनोळखी कॉलर निवडा आणि ब्लॉक वर क्लिक करा.

स्क्रीन लॉक इनेबल करा

1. स्क्रीन लॉक इनेबल करण्यासाठी, WhatsApp उघडा आणि सेटिंग्जवर जा.
2. यानंतर अकाउंट ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रायव्हसी वर जा.
3. खाली स्क्रोल करा आणि स्क्रीन लॉक टॅप करा.
4. अनलॉक करण्यासाठी येथे आवश्यक फेस आयडी/टच आयडी टॉगल ऑन करा.
5. स्क्रीन लॉक होण्यापूर्वी WhatsApp बंद केल्यानंतर किती वेळ जावा हे देखील तुम्ही निवडू शकता.

2 फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) इनेबल करा

1. ते इनेबल करण्यासाठी, WhatsApp सुरू करा आणि सेटिंग्जवर जा.
2. अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर, टू-स्टेप व्हेरिफिकेशन वर टॅप करा.
3. टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करा.
4. येथे 6 अंकी पिन टाका आणि नेक्स्ट टॅप करा.
5. तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट टाका.
6. त्यानंतर तुम्हाला कोडसह ईमेल मिळेल. WhatsApp मध्ये कोड टाका आणि Next वर क्लिक करा.

Web Title: Whatsapp privacy checkup feature know your account is protected and secure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.