WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:54 PM2022-07-22T17:54:57+5:302022-07-22T18:02:19+5:30

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत प्रायव्हेट चॅट करू शकता.

whatsapp private reply how to reply to private message on phone and whatsapp web | WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या?

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या?

googlenewsNext

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स (WhatsApp Groups) हा मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा एक सोयीचा मार्ग आहे. गेल्या काही महिन्यांत, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अ‍ॅपमध्ये काही मजेदार नवीन फीचर्स जोडले आहेत. यामध्ये 2GB पर्यंत फाईल शेअरिंग, अॅडमिन कंट्रोल, ग्रुप कॉल्स, डिसपिअरिंग मेसेजेस यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. बर्‍याच वेळा असे होते की, जेव्हा युजर एखाद्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवतो, तेव्हा त्या मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय (Private Reply) द्यायचा असतो. यासाठी प्रायव्हेट रिप्लाय हे फीचर खूप उपयुक्त आहे.

प्रायव्हेट रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत प्रायव्हेट चॅट करू शकता. अनेकवेळा आपण व्हॉट्सअ‍ॅप वरील मेसेजला रिप्लाय देतो, तेव्हा त्या ग्रुपमधील बाकीच्या युजर्सना अडचण होते. पण जर तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय फीचर वापरत असाल तर तुमचे चॅट सुद्धा होईल आणि बाकीच्यांना कोणतीही अडचण येणार नाही. हे फीचर Android, iOS आणि WhatsApp वेब/डेस्कटॉप अ‍ॅपवर उपलब्ध आहे. 

How to Reply to Private Messages on WhatsApp on Phone?
- सर्वात आधी तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा.
- त्यानंतर ग्रुप चॅटवर जा.
- आता ज्या मेसेजवर तुम्हाला प्रायव्हेट रिप्लाय द्यायचा आहे, त्यावर टॅप करा आणि धरून ठेवा.
- आता वरच्या उजव्या कोपऱ्यात मेनू बटणावर टॅप करा.
- त्यानंतर Reply Privately वर निवडा.
- आता पर्सनल चॅट दरम्यान ज्या मेसेजला तुम्ही सिलेक्ट केले आहे, तो आपोआप कोट होईल.
- आता नवीन प्रायव्हेट चॅट स्क्रीनवर मेसेज टाइप करा आणि पाठवा.

How to Reply to Private Messages on WhatsApp on WhatsApp Web?
- आता तुमच्या कॅम्प्युटरवर WhatsApp Web/Desktop app उघडा.
- आता ग्रुप चॅट वर जा.
-  यानंतर कोणताही मेसेज किंवा मीडियाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर क्लिक करा.
- त्यानंतर Reply privately वर क्लिक करा.
- आता तुम्ही सिलेक्ट केलेला मेसेज पर्सनल चॅटमध्ये आपोआप दिसेल.
-  नवीन प्रायव्हेट चॅट स्क्रीनवर मेसेज टाइप करा आणि पाठवा.

तुम्ही कोणताही टेक्स्ट, मेसेज किंवा व्हिडिओ मेसेजवर टॅप करून प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. स्क्रीन शॉटवरून स्पष्ट झाल्याप्रमाणे, प्रायव्हेट रिप्लाय फीचरमध्ये ग्रुपमधून मेसेज कोट होते. 

Web Title: whatsapp private reply how to reply to private message on phone and whatsapp web

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.