प्रतीक्षा संपली! व्हॉट्सऍपमध्ये आली पाच नवी फीचर, खूश होणार युजर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:29 PM2020-07-02T14:29:41+5:302020-07-02T15:22:19+5:30

सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं व्हॉट्सऍप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं.

WhatsApp releases host of new features: 5 things you need to know | प्रतीक्षा संपली! व्हॉट्सऍपमध्ये आली पाच नवी फीचर, खूश होणार युजर

प्रतीक्षा संपली! व्हॉट्सऍपमध्ये आली पाच नवी फीचर, खूश होणार युजर

googlenewsNext

नवी दिल्लीः सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं व्हॉट्सऍप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं. युजर्सला आश्चर्यचकित करण्याची एकही संधी व्हॉट्सऍप सोडत नाही. व्हॉट्सऍपनं मोबाइल ऍप आणि वेबसाठी नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. यात ऍनिमेटेड स्टिकर्ससह अनेक प्रकारच्या फीचर्सचा समावेश आहे. व्हॉट्सऍप ग्रुप कॉलिंग फीचरही अद्ययावत करण्यात आलेलं आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सऍपमध्ये जिओ फोनवर स्टेट्स सपोर्ट मिळणार आहे. त्याशिवाय वेबवर व्हॉट्सऍप डार्क मोडची सुविधाही मिळणार आहे.

येत्या काही दिवसांत ही फीचर्स ग्राहकांना वापरता येणार आहेत. पहिलं फीचर हे ऍनिमेटेड स्टिकर्सशी संबंधित आहे. मेसेज पाठवताना स्टिकर्सचा जास्त करून वापर केला जातो. त्यामुळेच आता अनलिमिटेड आणि मजेदार स्टिकर्स वापरता येणार आहेत. व्हॉट्सऍपनं क्यूआर कोडच्या फीचर्सही घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मवरून नवे कॉन्टॅक्ट जोडणं सहजशक्य होणार आहे. जेव्हा एखाद्या नव्या व्यक्तीला आपण भेटाल, तेव्हा त्याला फक्त क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितल्यानंतर तो तुमच्या व्हॉट्सऍपशी जोडला जाणार आहे.

व्हॉट्सऍप वेबसाठी डार्क मोडचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, वेब किंवा डेस्कटॉपवर ही फीचर्स आपल्याला वापरता येणार आहेत. या सुविधेची युजर बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. तसेच व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेतही सुधारणा करण्यात आली आहे. आता व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओच्या माध्यमातून चारऐवजी ८ जणांना एकमेकांशी गप्पा मारता येणार आहेत. व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा अपडेट करत बिटावरून ती व्हॉट्सऍपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. तसेच KaiOS युजर्सही व्हॉट्सऍपवर स्टेट्स शेअर करू शकणार आहेत. जे २४ तासांनंतर बदलणार आहे. 

हेही वाचा

SBIचा ग्राहकांना अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याचे नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा 'जंबो' विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!

मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान

कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा

बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल

Web Title: WhatsApp releases host of new features: 5 things you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.