आता WhatsApp वरही AI दाखवणार कमाल! आले २ शानदार फीचर्स, 'असा' होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:51 IST2024-12-17T13:50:36+5:302024-12-17T13:51:23+5:30

WhatsApp : WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत आहे. आता कंपनी WhatsApp बिझनेससाठी एक नवीन फीचर आणत आहे, जे WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी सुविधा देईल.

WhatsApp rolling out business platform connection feature and ai powered replies in latest update | आता WhatsApp वरही AI दाखवणार कमाल! आले २ शानदार फीचर्स, 'असा' होणार मोठा फायदा

आता WhatsApp वरही AI दाखवणार कमाल! आले २ शानदार फीचर्स, 'असा' होणार मोठा फायदा

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत आहे. आता कंपनी WhatsApp बिझनेससाठी एक नवीन फीचर आणत आहे, जे WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी सुविधा देईल. कंपनी आता ऑटोमॅटीक रिप्लायसाठी AI इंटिग्रेट करत आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या काही प्रश्नांची लगेचच उत्तरं मिळू शकतील आणि त्यामुळे त्यांचा त्या व्यवसायावरील विश्वास वाढेल. 

WhatsApp आपल्या युजर्ससाठी बिझनेस प्लॅटफॉर्म कनेक्शन आणि AI पावर्ड-रिप्लाय हे फीचर आणत आहे. बिझनेस प्लॅटफॉर्म कनेक्शनमधील युजर्सची एक मोठी समस्या सोडवली गेली आहे. आत्तापर्यंत, बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचे अकाऊंट मॅनेज करणारे युजर्स मोबाइल ॲपद्वारे त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंट एक्सेस करू शकत नव्हते. नवीन फीचर अंतर्गत, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, व्यवसायांना WhatsApp बिझनेस ॲप आणि बिझनेस प्लॅटफॉर्मवरून थेट मोबाइलवरून अकाऊंट एक्सेस करता येईल.

AI-पावर्ड रिप्लाय

लेटेस्ट अपडेटमध्ये, युजर्स त्यांच्या बिझनेस ॲप्सशी AI कनेक्ट करण्यात सक्षम होतील. यानंतर, AI त्यांच्या ग्राहकांच्या सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. हे उत्तर एआयने दिले असल्याचंही ग्राहकांना सांगितलं जाईल. कस्टमर सर्व्हिस सुधारण्यासाठी हे फीचर आणलं आहे. यामुळे, ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता येणार आहे आणि त्यांना रिप्लाय देण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल.

WhatsApp ने अद्याप आपल्या सर्व युजर्सना हे फीचर्स दिलेले नाहीत. सध्या ते बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहे आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते हळूहळू इतरांसाठी आणले जाईल. WhatsApp चे लेटेस्ट अपडेट मिळविण्यासाठी, तुमचं ॲप सतत अपडेट करत राहा. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम आहे. 
 

Web Title: WhatsApp rolling out business platform connection feature and ai powered replies in latest update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.