एकदा बघितल्यावर डिलीट होणार फोटोज आणि व्हिडियोज; WhatsApp मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर 

By सिद्धेश जाधव | Published: July 1, 2021 12:34 PM2021-07-01T12:34:50+5:302021-07-01T12:39:00+5:30

WhatsApp View Once feature: View Once फिचर मिळालेल्या युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल.

Whatsapp is rolling out view once feature for images and videos  | एकदा बघितल्यावर डिलीट होणार फोटोज आणि व्हिडियोज; WhatsApp मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर 

एकदा बघितल्यावर डिलीट होणार फोटोज आणि व्हिडियोज; WhatsApp मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर 

Next

WhatsApp ने बीटा युजर्ससाठी ‘View Once’ फीचर रोलआउट केले आहे. हे फिचर अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. केला आहे. गेले अनेक महिने या फिचरवर काम केल्यानंतर व्हाॅट्सअ‍ॅपवर हे फिचर उपलब्ध होणार आहे. हे फिचर  डिसपेअरिंग मेसेज फिचरचा एक भाग असेल जो इमेज आणि व्हिडीओ मेसेजसाठी डेवलप करण्यात आला आहे. View Once (एकदा बघा) फीचरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ रिसिव्हर  फक्त एकदा बघू बघू शकेल, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.  (WhatsApp is rolling out disappearing photos feature)

WhatsApp चा नवीन View Once फीचर अँड्रॉइडवरील WhatsApp beta अ‍ॅप व्हर्जन 2.21.14.3 मध्ये रोलआउट केला गेला आहे. जे युजर्स बीटा व्हर्जन वापरत नाहीत त्यांना या फिचरचा वापर करता येणार नाही. परंतु लवकरच नवीन अपडेटच्या माध्यमातून हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.  

View Once फीचर कसा असेल  

WABetaInfo ने काही स्क्रीनशॉट शेयर केले आहेत. हे फिचर मिळालेल्या युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ फक्त रिसिव्हरला फक्त एकदाच बघता येईल. मेसेज पाठवणाऱ्या युजरला मेसेज डिलिवर, सीन आणि ओपन्ड असे मेसेजचे स्टेटस दिसतील. म्हणजे रिसिव्हरने हा मेसेज उघडून बघितला कि नाही हे देखील समजेल.  

रिसिव्हर या मेसेजचा स्क्रिनशॉट घेऊ शकतील कारण व्हाॅट्सअ‍ॅपवर अजूनतरी स्क्रीनशॉट डिटेक्शन फिचर देण्यात आले नाही. नवीन View Once फीचर ग्रुपमध्ये देखील वापरता येईल. ग्रुपमधील सर्व मेम्बर्स फक्त एकदाच या फिचरच्या माध्यमातून पाठवलेला मेसेज बघू शकतील. या फिचरचा वापर करून मेसेज पाठवण्यासाठी View Once फिचर तुमच्या व्हाॅट्सअ‍ॅपवर असले पाहिजे परंतु View Once मेसेजेस रिसिव्ह करण्यासाठी या फिचरची आवश्यकता असणार नाही.  

Web Title: Whatsapp is rolling out view once feature for images and videos 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.