WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ 

By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 06:54 PM2021-07-13T18:54:58+5:302021-07-13T18:56:49+5:30

Whatsapp View Once Feature: WhatsApp ने ‘View Once’ फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरचा वापर करून पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ रिसिव्हरने एकदा बघितल्यावर आपोआप डिलीट होतील.  

Whatsapp rolling out view once feature on web and ios users  | WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ 

WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ 

Next

WhatsApp सतत नवनवीन फीचर्स आणून युजर्सचा अनुभव चांगला करण्यास मदत करत असते. कंपनीने आतापर्यंत असे अनेक फीचर्स सादर केले आहेत जे युजर्सना आवडत आहेत. आता कंपनीने ‘View Once’ फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरचा वापर करून पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ रिसिव्हरने एकदा बघितल्यावर आपोआप डिलीट होतील.  

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार कंपनीने हे फीचर WhatsApp Web वर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. व्यू वन्स फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेबअ‍ॅपच्या अपडेट व्हर्जन नंबर 2.2126.11 सह उपलब्ध होईल. व्यू वन्स फीचर मोबाईल युजर्ससाठी आधी उपलब्ध होईल याची अधिकृतपणे माहिती समोर आली नाही. परंतु अलीकडेच बातमी आली होती कि, व्हॉट्सअ‍ॅप हे फीचर अँड्रॉइड व्हर्जन नंबर 2.21.14.3 सह बीटा टेस्टर्ससाठी रोलआउट करेल. तसेच WhatsApp लवकरच iOS बीटा व्हर्जनमध्ये ‘व्यू वन्स’ फीचर घेऊन येणार आहे. आयओएसवर व्हाट्सअ‍ॅप बीटा युजर्ससाठी हे फीचर v 2.21.140.9 अपडेट सह उपलब्ध होईल.  

त्याचबरोबर व्हाट्सअ‍ॅप रीडिजाइन्ड इन-अ‍ॅप नोटिफिकेशनवर देखील काम करत आहे. या नवीन फिचरमुले व्हॉट्सअ‍ॅप बीटा युजर्सना नोटिफिकेशन बॅनर, फोटो, व्हिडीओ, जीआयएफ आणि स्टिकरची योग्य माहिती मिळेल. युजर्सना ही सुविधा यावर्षीच्या शेवटी मिळू शकते.  

Web Title: Whatsapp rolling out view once feature on web and ios users 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.