मस्तच! WhatsApp चं हटके फीचर; कॉल चालू असताना वाचता येणार मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:32 PM2019-11-26T15:32:28+5:302019-11-26T15:48:17+5:30
व्हॉट्सअॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून व्हॉट्सअॅपही युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर अँड्रॉईडमध्ये कधी येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
व्हॉट्सअॅप अपडेट केलेलं नसल्यास ते अॅप स्टोरवर सर्च करून इन्स्टॉल करा. त्यानंतर या नव्या फीचरचा वापर करता येईल. युजर्सच्या सुरक्षिततेचा देखीस व्हॉट्सअॅपने विचार केला आहे. युजर्स सेटिंगमध्ये जाईन ग्रुपमध्ये कोणाला अॅड करायचं तसेच कोणाला अॅड करायचं नाही हे ठरवू शकतात. कंपनी अँड्रॉईड बीटावर डिलीट मेसेजसाठी एका नव्या ऑप्शनची चाचणी करत आहे.
एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप चालणार आहे म्हणजेच अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. आयफोन युजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केलं आहे. मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरमध्ये युजर्सना अलर्ट मिळणार आहे. जर अन्य कोणी तुमच्या अकाऊंटमधून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबाबत एक अलर्ट युजर्सना मिळणार आहे. हे प्रायव्हसी फीचर सध्या केवळ iOS युजर्ससाठीच रोलआऊट करण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर व्हॉट्सअॅपवर अलर्ट येणार आहे. ज्यामध्ये 'तुमच्या फोन नंबरसाठी व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड रिक्वेस्ट आली आहे' असा मेसेज पाठवण्यात येणार आहे.
चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार
WhatsApp वरही घेता येणार Netflix वरच्या व्हिडीओची मजा
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.