दिवाळीआधी WhatsAppकडून मोठी भेट! युजर्ससाठी 3 दमदार नवे फीचर्स, 'असं' करा मजेशीर चॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:11 AM2021-11-03T11:11:19+5:302021-11-03T11:47:54+5:30
Whatsapp rolls out 3 new features : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअॅप अॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे.
नवी दिल्ली - फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी आपल्या अॅपमध्ये नेहमीच नवीन नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअॅप अॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. व्हॉट्सअॅपने दिवाळीआधी युजर्सना ही मोठी भेट दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया...
Desktop Photo Edito
WhatsApp ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर्स आहे. हे फीचर्स युजर्सला डेस्कटॉप अॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. WhatsApp च्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अॅड करू शकता. आतापर्यंत हे फीचर्स फक्त फोनवर उपलब्ध होते.
Link Previews
कोणीही ऑनलाईन लिंक पाठवून कोणासोबतही चर्चा सुरू करू शकतो. लोक आपल्या मित्रांसोबत ते ऑनलाइन काय करीत आहेत. काय पाहतात, आणि काय ऐकत आहेत याबाबत बोलण्यास नेहमीच उत्सुक असतात. व्हॉट्सअॅपने आपल्या चॅटिंगच्या दरम्यान, लिंक प्रीव्ह्यूच्या ऑप्शनला बदलले आहे. युजर्स आता पूर्ण लिंक प्रीव्ह्यू पाहू शकतात.
Sticker Suggestions
व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान स्टिकरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सामान्य रूपाने योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅब मधून जावे लागते. कधी कधी हे स्टिकर मिळत नाहीत. ज्याला तुम्ही शोधत आहात. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्सला चॅटिंग दरम्यान, आता स्टिकरचे सजेशन मिळेल. यावरून तुम्हाला एकदम योग्य स्टिकर वापर करण्यास मदत मिळेल. हे युजर्सच्या चॅटिंगच्या फ्लोवर परिणाम करू शकत नाहीत. आता नवीन फीचर्स आणल्यानंतर युजर्सला कोणताही त्रास होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी हे फीचर प्रायव्हसीला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. त्यांच्या पर्सनल मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनकडून सुरक्षित राहते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे.