WhatsApp स्टेटसमध्ये येतंय नवीन Creation टूल्स, युजर्सचा अॅप वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:33 IST2025-02-11T15:28:16+5:302025-02-11T15:33:33+5:30
कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.

WhatsApp स्टेटसमध्ये येतंय नवीन Creation टूल्स, युजर्सचा अॅप वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार!
नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे ३.५ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. अशा परिस्थितीत युजर्सच्या सोयीसाठी कंपनी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स अॅड करत असते. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) सेक्शनवर सतत काम करत आहे. कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.
अलीकडेच व्हॉट्सअॅपने व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये खास लोकांना मेन्शन करण्याचे फीचर आणले होते. यासोबतच स्टेटसमध्ये म्युझिक लावण्याचे फीचर देखील आणले होते. आता कंपनी स्टेटस सेक्शनसाठी एक नवीन क्रिएशन टूल आणणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सना लवकरच त्यांच्या स्टेटसमध्ये अनेक नवीन टूल्स मिळणार आहेत.
व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणारी वेबसाइट Wabetainfo कडून नवीन फीचरबाबत माहिती समोर आली आहे. Wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp beta for Android 2.25.3.2 व्हर्जनमध्ये आगामी क्रिएशन टूल्स स्पॉट करण्यात आले आहे. या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट Wabetainfo ने देखील शेअर केला आहे.
Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येत आहे की, युजर्सना लवकरच गॅलरी सेक्शनमध्ये स्टेटससाठी दोन शॉर्टकट मिळतील. या शॉर्टकट टूल्सद्वारे युजर्सना टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटसचे वेगवेगळे सेक्शन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
📝 WhatsApp beta for Android 2.25.3.22: what's new?
— WABetaInfo (@WABetaInfo) February 10, 2025
WhatsApp is rolling out a feature to improve accessibility to status creation tools, and it's available to some beta testers!
Some users can get this feature by installing certain previous updates.https://t.co/kSo4dsyHlIpic.twitter.com/C25h88tWcx
फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये...
नवीन फीचर रोल आउट झाल्यानंतर युजर्सना स्टेटस सेक्शनमध्ये फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्टसह एक नवीन व्हॉइस मेसेज सेक्शन स्वतंत्रपणे दिसेल. या ऑप्शनमुळे युजर्सना व्हॉइस नोट्स थेट व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये जोडता येतील. दरम्यान, व्हॉट्सअॅपमध्ये व्हॉइस नोट्स जोडण्याची सुविधा सध्या मिळते. परंतु यासाठी वेगळा ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच, हे आगामी फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि कंपनी लवकरच ते लाँच करू शकते.