WhatsApp वर आले एचडी फोटो फिचर; फोटो पाठवताना क्वालिटीसाठी मिळणार तीन पर्याय
By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 06:03 PM2021-07-17T18:03:38+5:302021-07-17T18:08:26+5:30
WhatsApp HD Photo Feature: WhatsApp वर एचडी फोटो फिचर सोबत आता इन्क्रिप्टेड बॅकअपचे फिचर देखील बीटा युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी नवीन फिचर रोलआऊट केले आहे. व्हॉट्सअॅप आता तुमचा चॅट बॅकअप कंपनीच्या क्लाऊडवर इन्क्रिप्ट करतो. हे फिचर 2.21.15.5 अँड्रॉइड बीटा अपडेटमध्ये देण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेबल व्हर्जनवर अजूनही गुगल ड्राइव्हसारख्या थर्ड पार्टी ऍप्सचा वापर करता येतो.
तुमचा बॅकअप इन्क्रिप्ट करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड बनवावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला बॅकअप रिस्टोर करायचा असेल तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड टाकावा लागेल. जर तुम्ही हा पासवर्ड विसरलात तर तुम्हाला तो चॅट बॅकअप रिस्टोर करता येणार नाही.
WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हा पासवर्ड व्हॉट्सअॅप, फेसबुक, गुगल किंवा फेसबुकला पाठवला जात नाही. या फिचरमध्ये तुमचा पासवर्ड रिस्टोर करण्यासाठी 64 अंकी इन्क्रिप्शन ‘की’ देखील वापरता येईल. परंतु जर ही ‘की’ हरवली तर तुम्हाला तुमचा डेटा मिळणार नाही.
व्हॉट्सअॅपने एचडी फोटो फीचरचा देखी समावेश केला आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही फोटो पाठवताना त्याची क्वालिटी निवडू शकता. अँड्रॉइड बीटा टेस्टर्सना क्वालिटीसाठी तीन वेगवेगळे पर्याय मिळत आहेत. यात बेस्ट क्वालिटी, ऑटो आणि डेटा सेव्हर अश्या तीन पर्यायांचा समावेश आहे. हे फिचर सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र अजून समोर आली नाही.