WhatsApp Safety: हॅकरचा महिलेला 15 लाखांचा गंडा, WhatsApp वरुन केली फसवणूक; तुम्ही करू नका अशी चूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:23 IST2022-06-02T15:22:59+5:302022-06-02T15:23:06+5:30
WhatsApp Safety: व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळते, पण कधीकधी यातून धोकाही निर्माण होऊ शकतो.

WhatsApp Safety: हॅकरचा महिलेला 15 लाखांचा गंडा, WhatsApp वरुन केली फसवणूक; तुम्ही करू नका अशी चूक...
WhatsApp Safety: व्हॉट्सअॅप आपल्यासाठी जेवढ्या सोयींनी परिपूर्ण आहे, तेवढेच त्यातून सातत्याने समोर येत आहेत. व्हॉट्सअॅपमधून हॅकर्सनी युजर्सना फसवून सहज पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमधील एका महिलेला हॅकर्सचा चांगलाच फटका बसला. महिलेच्या व्हॉट्सअॅपवर सुमारे £16,000 (15.62 लाख रुपयांहून अधिक) चा घोटाळा करण्यात आला.
अशी झाली फसवणूक
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित पॉला बॉटनला एक टेक्स्ट मेसेज आला होता. तिला वाटले की, हा संदेश आपल्या मुलीचा आहे. मेसेजमध्ये, तिने आपल्या आईला जुना फोन नंबर हटवण्यास आणि तिला नवीन नंबर देण्यास सांगितले. पॉलाने सांगितले की, त्यानंतर तिच्या मुलीने तिला काही पैशांचे व्यवहार करण्यास सांगितले. पॉलाने लगेच व्यवहार केला, यानंतर हॅकर्सनी त्याकडून 15.62 लाख रुपये लुटले.
अशा प्रकारे हॅकर्स हल्ला करत आहेत
याशिवाय, अलीकडेच क्लाउडसेकचे सीईओ आणि संस्थापक राहुल सासी यांनी माहिती दिली की, हॅकर्सना आता एक नवीन मार्ग सापडला आहे. याद्वारे ते युझर्सना लाच देत आहेत आणि त्यातून पैसे लुटत आहेत. ही नवीन युक्ती अतिशय सोपी आहे, ज्याद्वारे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जाऊ शकते. यात व्यक्तीला हॅकरकडून कॉल येतो आणि तो युझरला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यास सांगतो. त्या व्यक्तीने तो नंबर डायल केल्यास हॅकर त्याच्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतात.
सुरक्षित कसे राहावे
1.अज्ञात नंबरवरून येणारे कॉल टाळा.
2. तुम्ही अनोळखी नंबरवरून कॉल उचलला तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
3. कॉल दरम्यान OTP प्राप्त झाल्यास, तो डायल करू नका.
4. कोणतेही वैयक्तिक किंवा बँक तपशील शेअर करणे टाळा.