WhatsApp Scam: तुमचंही व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 23:02 IST2025-02-05T23:02:13+5:302025-02-05T23:02:55+5:30

व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता हेच व्हॉट्सॲप हॅक होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेकांचे WhatsApp हॅक झाल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत.

WhatsApp Scam Can your WhatsApp be hacked? Keep these settings to avoid scams | WhatsApp Scam: तुमचंही व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा

WhatsApp Scam: तुमचंही व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा

आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसापासून व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सॲप हॅक होत आहेत. या अ‍ॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.

सुरक्षित व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुम्हाला काही सेटींग कराव्या लागतील. या सेटींग तुम्ही केल्या तर तुमचे खाते हॅक होण्यापासून वाचू शकते. 

टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा

तुमचे WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी, टु स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा. 

स्टेप 1 - सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील सेटिंग्ज मेनूमध्ये जावे लागेल.

स्टेप 2 - यानंतर, तुम्हाला प्रायव्हसी ऑप्शन निवडावा लागेल.

स्टेप 3 - येथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन सहा अंकी पीन सेट करावा लागेल.

जर एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हाट्सअॅपवर मेसेज आला तर तो मेसेज काळजीपूर्वक उघडा. या मेसेजध्ये अनेकदा संशयास्पद लिंक्स शेअर केल्या जातात. यावर क्लिक करण्यापूर्वी नीट तपासा. या लिंक्समध्ये मालवेअर असू शकते किंवा ते फिशिंग हल्लासाठी असू शकतात.

प्रायव्हसी सेटींग ठेवा

तुमच्या WhatsApp खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज नेहमी अपडेट ठेवा. 

Last Seen & Online: या सेटींगला My Contacts किंवा Nobody वर सेट करा.

Profile Photo: यामध्ये My Contacts सेट करा, कारण अनोळखी लोकांना तुमचा डीपी दिसणार नाही.

Status & About: या सेटींगला My Contacts असं करा.

जर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन फोन किंवा मेसेज येत असतील तर ते नंबर ब्लॉक करा. 

ऑटो डाऊनलोड बंद करा

WhatsApp वर ऑटोमॅटिक मीडिया फाइल डाउनलोडिंग बंद करा. असे केल्याने, तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटवर येणारे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे थेट डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार नाहीत.

ऑटो डाऊनलोड बंद करण्यासाठी पहिल्यांदा सेटिंग्ज मेनूवर जा. यानंतर तुम्हाला स्टोरेज आणि डेटा आणि मीडिया ऑटो-डाउनलोड वर जावे लागेल. येथे जा आणि सेटिंग कधीही नाही वर सेट करा. तसेच तुमचे अकाऊंट कोणत्या डिव्हाईसवर लॉगिन आहे हे चेक करत जा.

Web Title: WhatsApp Scam Can your WhatsApp be hacked? Keep these settings to avoid scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.