मोठी बातमी! तुमच्या मोबाइलमधील WhatsApp १५ मेनंतरही डिलीट होणार नाही, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:32 PM2021-05-07T21:32:37+5:302021-05-07T21:33:05+5:30
इन्संट मेसेजिंग अॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे.
इन्संट मेसेजिंग अॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीवरुन बरीच चर्चा सुरू होती. येत्या १५ मेपर्यंत व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीचा स्वीकार न केल्यास ते बंद होणार होतं. पण आता कंपनीनं यात माघार घेतली आहे. नव्या पॉलिसीचा स्वीकार करण्याची १५ मेची अंतिम मुदत आता व्हॉट्सअॅपनं मागे घेतली आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांनी नव्या पॉलिसीचा स्वीकार केला नाही तरी त्याचा वापर करता येणार आहे. (WhatsApp scraps May 15 deadline for accepting privacy policy terms)
व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांसाठी आता कोणत्याही नव्या पॉलिसीचं बंधन सध्यातरी नाहीय. त्यामुळे युजर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कंपनीकडून येणाऱ्या काही दिवसांत नव्या डेडलाइनची घोषणा केली जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नव्या पॉलिसीचं संकट अद्यापही कायमस्वरुपी टळलेलं दिसत नाही.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. अनेकांनी या पॉलिसीला विरोध केला असून नव्या मेसेजिंग app चा वापर करण्यासही सुरुवात केली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते. मात्र त्यावरून युजर्समध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकला मोठा फटका देखील बसला आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीवर जोरदार टीका केली जात आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.